महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Toilets For Transgender In Mumbai : तृतीयपंथीयासाठी मुंबईत बांधले पहिले शौचालय;शिवसेनेचा पुढाकार - first toilet built in Mumbai for Transgender

सर्वसाधारण महिला आणि पुरुष असेच सर्वत्र शौचालय आहेत. परंतु, तृतीय पंथीयांसमोर शौचालयात जायचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे त्यांची कुचंबणा होत होती. त्यामुळे त्यांच्यासाठीही शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांसाठी होती. याची दखल घेत गोरेगाव पूर्वेकडील आरे नाका येथे महापालिकेच्या शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात तृतीयपंथीयांसाठी राज्यातील पहिले ट्रान्सजेंडर शौचालय उभारण्यात आले आहे.

तृतीयपंथीयासाठी मुंबईत बांधले पहिले शौचालय
तृतीयपंथीयासाठी मुंबईत बांधले पहिले शौचालय

By

Published : Apr 6, 2022, 9:14 AM IST

मुंबई - मुंबईत महिला आणि पुरुष अशीच शौचालये आहेत. यामुळे कोणत्या शौचालयात जायचा असा प्रश्न तृतीयपंथीयांसमोर होता. यामुळे त्यांची कुचंबणा होत होती. (first toilet built in Mumbai for Transgender) त्यामुळे त्यांच्यासाठीही शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांसाठी होती. याची दखल घेत गोरेगाव पूर्वेकडील आरे नाका येथे महापालिकेच्या शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात तृतीयपंथीयांसाठी राज्यातील पहिले ट्रान्सजेंडर शौचालय उभारण्यात आले आहे.

मुंबईतील पहिले शौचालय -मुंबईत तृतीयपंथीय लोकांसाठी शौचालय असावे अशी मागणी गेले कित्येक वर्षे केली जात होती. मात्र, यासाठी कोणच पुढाकार घेत नव्हते. पालिका आणि राज्य सरकारकडूनही यासाठी प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर सारथी फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांना तृतीयपंथीच्या बाबत माहिती देत याबाबत पत्र दिले.

तृतीयपंथीयासाठी मुंबईतील हे पहिले शौचालय - या पत्रानंतर तृतीयपंथीची मागणी मान्य करून शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात शौचालयाचे काम आमदार फंडातून करून बांधण्यात आले. गोरेगाव चेकनाका याठिकाणी अनेक तृतीयपंथी सिग्नलवर उभे असतात. तसेच अनेक तृतीय पंथी या विभागात राहण्यासाठी असल्यामुळे अशा तृतीयपंथी नागरिकांना याचा लाभ होईल. तृतीयपंथीयासाठी मुंबईतील हे पहिले शौचालय आहे.

मुंबईत शौचालये उभारा -मुंबईत जागोजागी, रेल्वे स्थानक, उद्यान, रस्त्यावर, वस्त्यांमध्ये शौचालय आहेत. ही सर्व शौचालये पुरुष आणि स्त्रियांसाठी आहेत. यामुळे तृतीयपंथीयांना शौचालयात जाताना त्रासदायक ठरत होते. या कारणाने तृतीयपंथीयांसाठी वेगळे शौचालय उभारावे अशी मागणी करण्यात येत होती. गोरेगाव प्रमाणेच मुंबईत इतरही ठिकाणी अशी शौचालये उभारावीत अशी मागणी तृतीयपंथीयांची आहे.

हेही वाचा -ठाकरे सरकारला मोठा झटका; स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर

ABOUT THE AUTHOR

...view details