मुंबई -शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला आज रविवार (दि. 14 ऑगस्ट)रोजी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ अपघात झाला दरम्यानच्या काळात मेटे यांन तत्काळ मदत मिळाली नाही त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला अस डॉक्टरांनी कळवले मेटे हे आपल्या बीड जिल्ह्यातील निवासस्थानी होते मात्र मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या त्यानंतर बीडमधील कार्यक्रम सोडून विनायक मेटे मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी तयार झाले दरम्यान घरचे सर्व मंडळी म्हणाले तुम्ही मुंबईला उद्या सकाळी जा मात्र उद्या उशिर होऊ शकतो म्हणून त्यांनी जाण्याची भूमिका घेतली पुढे ही दुरेदैवी घटना घडली
Vinayak Mete passed away घरच्यांनी मुंबईली आज नका जाऊ म्हणून केली होती विनंती मात्र उशिर होण्याच्या भितीने मेटे मुंबई निघाले - Shiv Sangram Party President Vinayak Mete
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला आज रविवार (दि. 14 ऑगस्ट)रोजी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ अपघात झाला दरम्यानच्या काळात मेटे यांन तत्काळ मदत मिळाली नाही त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला अस डॉक्टरांनी कळवले.
विनायक मेटे हे झपाटलेले कार्यकर्तेविनायक मेटे हे मराठा आरक्षणासाठी झपाटलेले नेते आणि कार्यकर्ते होते गेली अनेक वर्षे विनायक मेटे हे राज्याच्या राजकारणात सहभागी आहेत मात्र मराठा आरक्षण मुद्यावर त्यांनी अहोरात्र काम केलं आहे आजही ते मराठा आरक्षणसाठी असलेल्या बैठकीसाठी मुंबईला यायला निघाले आणि हा अपघात झाला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या चळवळीतील आज काळा दिवस असल्याचे मत काँग्रेचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केले आहे तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे योग्यवेळी मेटे यांना मदत मिळाली असती तर त्यांना वाचवता येऊ शकले असते मात्र आता द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहचण्यासाठी शासनाने नव्या उओयोजना कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे भाई जगताप यावेळी म्हणाले
हेही वाचा -मेटेंच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी