महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर होणार - MNS latest news

पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल करण्याचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या दिशेने सक्रिय होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत अशी घोषणा काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका कार्यक्रमात केली होती. आता लवकरच मनसेच्या वतीने आयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे

By

Published : Feb 24, 2021, 9:42 PM IST

मुंबई -पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल करण्याचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या दिशेने सक्रिय होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत अशी घोषणा काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका कार्यक्रमात केली होती. एक ते नऊ मार्चदरम्यान राज ठाकरे आयोध्याला जाणार असल्याची चर्चा आहे, त्यांच्या आयोध्या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनं मनसेची महत्त्वाची बैठक काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झाली होती. राज ठाकरे हे १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं होत. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेची हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल

पक्षाच्या विविध आंदोलनामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी चर्चेत असते, मात्र संसदीय राजकारणात मनसेची ताकद खूपच कमी आहे. एक आमदार आणि आणि काही नगरसेवक एवढीच मनसेची ताकद आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणाऱ्या राज ठाकरे यांनी कालांतरानं मोदींविरोधात आघाडी उघडली होती. त्यानंतर अचानक त्यांनी हिंदुत्वाची कास धरली आणि मोदी विरोधही थांबवला. आता नव्या भूमिकेसह मनसे निवडणुकांच्या आखाड्यात उतरली आहे. मात्र मनसेची बदललेली भूमिका तरी त्यांना निवडणुकीत यश मिळून देईल का? हे पाहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

२७ फेब्रुवारीला स्वाक्षरी मोहीम

२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस आहे, मराठी भाषा दिवसानिमित्त मनसेच्या वतीने मराठीतून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे स्वत: या मोहीमेला उपस्थीत राहणार आहेत. यावेळी मराठी शिक्षक, खेळाडू, साहित्यिक, कलावंत यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details