'एमआयडीसी'वरील सायबर हल्ला रशियातून! - Cyber attack
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संगणकीय प्रणालीवर २१ मार्चच्या मध्यरात्री सायबर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला रशियातून झाल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या हल्ल्यात आरोपींकडून रॅन्समवेअर वापरण्यात आलं होतं.
मुंबई- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संगणकीय प्रणालीवर २१ मार्चच्या मध्यरात्री सायबर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला रशियातून झाल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या हल्ल्यात आरोपींकडून रॅन्समवेअर वापरण्यात आलं होतं.
या हल्ल्यामुळे एमआयडीसीच्या 16 विभागातील कारभार 8 तासांसाठी ठप्प झाला होता. या हल्ल्यात 500 कोटींची मागणी आरोपींकडून झाल्याचं बोललं जात होतं. मात्र पोलिसात तक्रारीत तसा कोणता उल्लेख नसल्याचं दिसून आलंय. या घटनेची दखल सायबर विभागाकडून घेण्यात आली असून घटनेचा तपास सुरु आहे.
सविस्तर वृत्त थोड्याचवेळात...