महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aryan Khan Drugs Case : सत्र न्यायालयात आरोप पत्रावरील युक्तीवाद पूर्ण; उद्या निर्णयाची शक्यता - सत्र न्यायालय

आर्यन खान ड्रग प्रकरणात ( Aryan Khan Drugs Case ) एनसीबीतर्फे ( NCB ) आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढीव वेळेची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) आज सुनावणी करण्यात आली. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून गुरुवारी (दि. 31 मार्च) दुपारी याबाबत फैसला सुनावण्याची शक्यता आहे.

Breaking News

By

Published : Mar 30, 2022, 9:05 PM IST

मुंबई -आर्यन खान ड्रग प्रकरणात ( Aryan Khan Drugs Case ) एनसीबीतर्फे ( NCB ) आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढीव वेळेची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी करण्यात आली. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून गुरुवारी (दि. 31 मार्च) दुपारी निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

एनसीबीने युक्तिवाद केला की, तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे आणि मुख्य संशयितांचे जबाब नोंदवायचे आहेत. शिवाय, पुण्यातील न्यायालयीन कोठडीत असलेले के पी गोसावी आणि आता विरोधक बनलेले प्रभाकर सेल यांचे जबाब प्रलंबित आहेत. तसेच, तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्याच्या पुण्यातील अहवालात सायकोट्रॉपिक पदार्थांचा पॉझिटिव्ह आले आहे. एनसीबीने असेही म्हटले आहे की तपास एका निर्णायक टप्प्यावर असल्याने आम्हाला सर्व माहिती एकत्र करणे आणि सर्व माहिती जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला कोणतेही पूरक आरोपपत्र दाखल करायचे नाही. त्यामुळेच आम्हाला मुदतवाढ हवी आहे, असा युक्तिवाद एनसीबीच्या वतीने अॅड. सेठना यांनी केला आहे.

एनसीबीकडून न्यायालयात सांगण्यात आले की, या प्रकरणात सीएफएसएल लॅबमध्ये तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आलेल्या सर्व 17 सायकोट्रोपिक नमुने पोजिटिव्ह आले आहेत. याचाच अर्थ असा की आमचा तपास योग्य मार्गावर आहे. एकूण 69 साक्षीदारांचा जावाब आतापर्यंत नोंदविण्यात आला आहे. 10 स्वतंत्र साक्षीदारांचा जावाब ही नोंदविण्यात गेला आहे मात्र, चौघांचा अजूनही बाकी आहे. 19 संशयितांचा जावाब नोंदविण्यात आला आहे. 15 महत्त्वाच्या संशयितांचा जबाब नोंदवायचा बाकी आहे. म्हणून आम्हाला 90 दिवसांचा वाढीव वेळ देण्यात यावा, अशी एनसीबीतर्फे मागणी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ? - 2 ऑक्टोबरला एनसीबीने मुंबईतील क्रुझवर सुरू असलेल्या पार्टीवर छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा होता. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार होती. आता न्यायालयाने ती अट शिथील केली आ

हेही वाचा -Drain Clean In Mumbai : मुंबई महापालिका प्रशासनापुढे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details