मालवणी येथील तरुणांना इसिसमध्ये भरती करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने ठरवले दोषी - भारतातील तरुणांची इसिसमध्ये भरती
मालाडमधील मालवणी येथील तरुणांना इस्लामिक स्टेट ISIS मध्ये पाठवण्यात आणि त्यांना कट्टर इस्लामीवादी बनवल्याचा आरोप असलेल्या रिझवान अहमद आणि मोहसीन सय्यद यांनी मागील सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर आपले गुन्हा कबूल केला होता. त्यांनी दिलेल्या लेखी कबुली जबाबावर आज सुनावणी पार पडली व यासंदर्भात त्यांना काय शिक्षा होणार याचा फैसला सात जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत होणार आहे.
मुंबई -मालाडमधील मालवणी येथील तरुणांना इस्लामिक स्टेट ISIS मध्ये पाठवण्यात आणि त्यांना कट्टर इस्लामीवादी बनवल्याचा आरोप असलेल्या रिझवान अहमद आणि मोहसीन सय्यद यांनी मागील सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर आपले गुन्हा कबूल केला होता. न्यायालयाने त्यावेळी लेखी स्वरुपात द्यायला सांगितल्यानंतर आरोपींनी न्यायालयात लेखी स्वरूपात अर्जाद्वारे आरोप कबूल केले होते. तो अर्ज आज (बुधवार) झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने मंजूर केला असून आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 7 जानेवारी रोजी होणार आहे. आरोपींना काय शिक्षा द्यायची यासंदर्भात निर्णय विशेष न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत राखून ठेवला आहे.
काय आहे प्रकरण -
अहमद आणि सय्यद यांच्यावर मालवणी येथील अयाज सुलतान, मोहसीन, अब्दुल बशीर आणि नूर मोहम्मद या तरुणांना 2015 मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी भडकावल्याबद्दल खटला चालवला जात आहे. तपास यंत्रणांनी सांगितले की अहमद हा भारतातील ISIS विंगचा सेकंड-इन-कमांड होता. या खटल्यात 220 हून अधिक साक्षीदार आहेत.
फिर्यादीचे दावे फेटाळताना, अहमदने 2013 मध्ये आरोपी आयाज मोहम्मदचे कथित कट्टरपंथीकरण सुरू झाले तेव्हा तो लहान होता असा दावा केला होता. फिर्यादीने आरोप केला होता की सय्यद, सुतार नूर मोहम्मद आणि भाजी विक्रेत्याचा मुलगा वाजिद शेख हे डिसेंबर 2015 मध्ये बेपत्ता झाले होते आणि तिघांनी ISIS मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता.