मुंबई -मुंबई एनसीबीने 2021 Narcotics Control Bureauureauमध्ये कुणाल कडू यांच्या घरातून 48 किलो वजनाच्या तीन पॅकेटमध्ये हिरव्या पानांचे साहित्य जप्त Drug Trafficker Case केले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात Bombay High Court अटकपूर्व जामीनासाठी कडू यांनी धाव घेतली असता न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, जर गांजाच्या झाडाला फुले, फळ नसले तर त्याचा भोग म्हणून उपयोग करण्यात येत नाही. या आधारावर आरोपीला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने मंजूर केला आहे.
झाडाला फळ येत नसेल तर 'हे' झाड गांजाच्या गटामध्ये येत नाही; न्यायालयाने नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण
मुंबई एनसीबीने Narcotics Control Bureauureau कुणाल कडू यांच्या घरातून 48 किलो वजनाच्या तीन पॅकेटमध्ये हिरव्या पानांचे साहित्य जप्त Drug Trafficker Case केले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात Bombay High Court अटकपूर्व जामीनासाठी कडू यांनी धाव घेतली असता न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
'हे' झाड गांजाच्या गटामध्ये येत नाही -न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने निकालात असे म्हटले आहे की, गांजाच्या रोपाला फुले नसतील किंवा वर फळ नसेल तर त्याचे भांग म्हणून उल्लेख करता येणार नाही. या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने अंमली पदार्थांचे व्यावसायिक प्रमाण बाळगल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. एनसीबीने की जप्त केलेली गांजाची रोपे ज्यावर फुले किंवा फळे नसतात ती गांजाच्या गटामध्ये येत नाही. 29 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात आरोपीच्या घरातून अमली पदार्थ नियंत्रण विभागाने जप्त केलेला पदार्थ, एनसीबीने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवलेले नमुने यात तफावत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. वास्तविक कुणाल कडू यांनी अटक टाळण्यासाठी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. एनसीबीने कुणालविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या गुन्ह्याखाली विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयाने नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण -एनसीबीने एप्रिल 2021 मध्ये कडू यांच्या घरातून 48 किलो वजनाच्या तीन पॅकेटमध्ये हिरव्या पानांचे साहित्य जप्त केले होते. हा हिरवा पानांचा पदार्थ गांजा असल्याचा आरोप एनसीबीने केला होता आणि कुणालच्या घरातून जप्त करण्यात आलेला 48 किलो पदार्थ व्यावसायिक प्रमाणात आला होता. न्यायमूर्ती डांगरे यांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत भांगाची व्याख्या स्पष्ट करताना सांगितले की भांग हा भांगाच्या झाडाच्या वरच्या बाजूस फुलणारा किंवा फळ देणारा पदार्थ आहे. जेव्हा फूल किंवा फळ देणारा पदार्थ वर नसतो तेव्हा त्याच्या बिया, पाने असतात. वनस्पतींना असे संबोधले जाते. बियाणे, पाने एकत्र फळ किंवा फुले येत असतील तर ते भांग आहे. परंतु जेव्हा बी आणि पाने एकत्र फळ देत नाहीत तेव्हा ते भांग मानले जाणार नाही. न्यायालयाने सांगितले की सध्याच्या प्रकरणात एनसीबीने आरोपीच्या घरातून हिरव्या पानांचे साहित्य जप्त केल्याचे म्हटले आहे. रोपाच्या वरच्या बाजूला फुले व फळे आल्याचा उल्लेख नाही.
हेही वाचा -Actor Sushant Singh Rajput Suicide Case : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज पेडलर अनुज केशवानीच्या जामीन अर्जामध्ये एनसीबीवर गंभीर आरोप