महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut : ईडी, सीबीआयने धाडी टाकलेल्या कंपनीकडून किरीट सोमय्यांच्या संस्थेला देणगी, राऊतांचा आरोप - संजय राऊतांचे किरीट सोमय्यांवर आरोप

पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणात ( Metro Dairy Case West Bengal ) ईडी आणि सीबीआयने धाडी ( ED CBI Raid ) टाकून चौकशी केलेल्या कंपनीकडून भाजप नेते किरीट सोमय्यांच्या संस्थेला ( Yuvak Pratishthan ) देणगी देण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला ( Sanjay Raut Allegation On Kirit Somaiya ) आहे.

sanjay raut kirit somaiya
संजय राऊत किरीट सोमय्या

By

Published : May 10, 2022, 9:59 AM IST

मुंबई - पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणात ( Metro Dairy Case West Bengal ) ईडी आणि सीबीआयने धाडी टाकून ( ED CBI Raid ) चौकशी केलेल्या कंपनीकडून भाजप नेते किरीट सोमय्यांच्या संस्थेला ( Yuvak Pratishthan ) देणगी देण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आप क्रोनॉलॉजी समझिये, हिसाब तो देना पडेगा, म्हणत राऊतांनी ट्विट केले ( Sanjay Raut Allegation On Kirit Somaiya ) आहे.

किरीट का कमाल भाग २ :शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजप नेते किरीट सोमय्यांवर सातत्याने आरोपांची सरबत्ती करत असतात. काल संजय राऊत यांनी किरीट का कमाल असे ट्विट करत, सोमय्यांनी ज्या कंपन्यावर आरोप केले होते, त्यांच्याकडून स्वतःच्या संस्थेकरिता दोन वर्षांनी देणग्या घेतल्या. ही क्रोनोलॉजी समजीए असं सांगत केंद्रीय तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच मोदींच्या भ्रष्टाचार मुक्त संकल्प असलेला सोमय्यांचा फोटो ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यातच आज सोमय्या यांनी किरीट कमाल २ जाहीर करत सोमय्यांना अडचणीत आणले आहे.

आज पुन्हा नवीन आरोप : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप नेते किरीट सोमय्यांकडून नेते, मंत्र्यांवर विविध आरोपांचा भडीमार सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत अनेक प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील सोमय्यांनी कथित भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. राऊत यांनी ही सोमय्यांवर आरोप करत प्रत्युत्तर देत आहेत. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी सोमय्या पिता - पुत्रांनी जमवलेल्या निधीत अफरातफर केली, असा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणानंतर गुन्हा दाखल झाल्याने सोमय्या नॉट रीचेबल झाले. मात्र न्यायालयाने सोमय्यांना अटकपूर्व जामीन दिल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटच्या माध्यमातून सोमय्यावर नवीन आरोप केले आहेत.


काय आहेत आरोप :सन 2013 14 मध्ये किरीट सोमय्यांनी एका कंपनी विरोधात आरोप केले होते. संबंधित कंपनीच्या प्रमुखाची ईडीकडून चौकशी झाली. पुढे 2017-18 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. ही क्रोनोलॉजी समजीए, अस सांगत राऊत यांनी सर्व प्रकरणी तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सुरुवातीला 'किरीट का कमाल २' असे ट्विट केले आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधीचा निधी कसा मिळला. की काळा पैसा पांढरा करायचा घाणेरडा डाव आहे, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. या सर्वांचा हिशोब द्यावाच लागेल. या प्रकरणी धर्मादाय आयुक्त, तपास यंत्रणाकडे तक्रार केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राऊत आणि सोमय्या असा वाद पुन्हा रंगणार आहे. त्यातच आता आरोपांचा दुसरा भाग ट्विट केल्याने सोमय्यांच्या अडचणी वाढणार आहेत.



हेही वाचा : Sanjay Raut On Kirit Somaiya : 'उगाच फडफडू नका सगळी पीस गळून पडतील'; संजय राऊत यांची सोमैयांवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details