महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron Variant - विदेशातून येणाऱ्या लोकांबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घ्यायला हवी -अजित पवार - महापरिनिर्वाण दिवस 2021

सध्या वेगवेगळ्या देशातून ( Role of Central Government regarding Omicron ) येणाऱ्या लोकांबाबत कठोर भूमिका केंद्र सरकारने घ्यायला हवी. (Omicron Variant ) सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळवर नियमांचं पालन केले जात आहे की नाही? याकडे काटेकोर लक्ष द्यायला पाहिजे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ( Ajit Pawar reaction to Omicron ) ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलत बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले

By

Published : Dec 6, 2021, 1:03 PM IST

मुंबई -ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यामध्ये सापडत आहेत. त्यामुळे या सर्व परिस्थितीवर राज्य सरकारचे बारीक लक्ष आहे. सध्या विदेशातून येणाऱ्या लोकांबाबत कठोर भूमिका केंद्र सरकारने घ्यायला हवी. ( Role of Central Government regarding Omicron ) सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळवर ( Rules for citizens coming from abroad ) नियमांचं पालन केले जात आहे की नाही? याकडे काटेकोर लक्ष द्यायला पाहिजे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलत बोलत होते.

विभाग आणि आरोग्य विभागाच्या नव्या नियमांबाबत एक सूचना काढणे गरजेचे

कोरोनाची सुरुवात मुळात भारतात एक जोडपं दुबईवरून आले आणि त्यांनी प्रवास केल्यानंतर त्यांच्यासोबतच्या ड्राइव्हरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा प्रसार झाला होता. ( Patients of Omicron in India ) आत्ताच्या देखील काळात वेगवेगळ्या राज्यात एक दोन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे देशपातळीवर आरोग्य विभाग आणि आरोग्य विभागाच्या नव्या नियमांबाबत एक सूचना काढणे गरजेचे असल्याचे

बूस्टर डोस बाबत केंद्राने निर्णय घ्यावा

लसीचे दोन-दोन डोस घेणाऱ्या नागरिकांनादेखील कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे बूस्टर डोसबाबत देखील केंद्राने निर्णय घ्यायला हवा असही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. तसेच, निर्णय झाल्यात राज्य सरकारकडे बूस्टर डोस देण्यासाठी डोस उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ( Ajit Pawar reaction to Omicron ) बूस्टर डोस देण्याबाबत सध्या चर्चा सुरू असून यावर संशोधन करणाऱ्यांनी लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ( New Omicron Variant Cases in India ) केंद्र सरकारने बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेतल्यास बूस्टर डोस दिल्याने कोणते फायदे किंवा तोटे होतील याबाबतही स्पष्टता आणण्याची गरज आहे, असही यावेळी ते म्हणाले आहेत.

नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये प्रचंड गर्दी

सध्या राज्यामध्ये ओमायक्रोन चा प्रभाव वाढताना दिसत आहे. यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. तरीही राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होताना दिसते. तसेच, राजकीय नेत्यांच्या घरी असलेल्या लग्नसोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून लोकही निष्काळजीपणाने वागत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत लवकरात लवकर नियम करणे गरजेचे असून सर्व राज्य नियमांची अंमलबजावणी करतील असेही यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा -Wasim Rizvi Accept Sanatan Dharma : वसीम झाले आता जितेंद्र रिजवींनी घेतला सनातन धर्मात प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details