महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचे कारण दोन दिवसात स्पष्ट होणार, कोरोना वाढल्यास मास्क सक्तीचे सूतोवाच - corona outbreak in Mumbai

मुंबईत कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. अचानक ही रुग्ण संख्या का वाढली, मुंबईत कोणत्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आहेत का याची माहिती येत्या दोन दिवसात जिनोम सिक्वेंसिंग चाचण्यांमधून समोर येणार आहे. सध्या रुग्ण संख्या वाढत असली तरी त्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली.

मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचे कारण दोन दिवसात स्पष्ट होणार
मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचे कारण दोन दिवसात स्पष्ट होणार

By

Published : Jun 3, 2022, 6:47 AM IST

Updated : Jun 3, 2022, 8:03 AM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असतानाच पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. अचानक ही रुग्ण संख्या का वाढली, मुंबईत कोणत्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आहेत का याची माहिती येत्या दोन दिवसात जिनोम सिक्वेंसिंग चाचण्यांमधून समोर येणार आहे. सध्या रुग्ण संख्या वाढत असली तरी त्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली.

... अन्यथा मास्कसक्ती होणार - राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र ही संख्या अशीच वाढत राहिली तर मास्क वापरणे सक्तीचे करावे लागेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत आढावा बैठक घेतली. तसेच काही उपाययोजनांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जीनोम सिकवेंसींग चाचण्या -मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा आल्या. जानेवारी नंतर रुग्ण संख्या कमी होऊ लागली. एप्रिल मे मध्ये २० ते ३० रुग्णांची नोंद होत होती. मात्र मे च्या शेवटी पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. जून मध्ये रोज ७०० हून अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. ही रुग्ण संख्या नेमकी कशामुळे वाढत आहे याचे नेमके कारण शोधण्यासाठी आम्ही जीनोम सिकवेन्सिंग चाचण्या केल्या आहेत. त्यामधून कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण आहेत, कोणत्या व्हेरियंटचा प्रसार होत आहे याची माहिती येत्या दोन दिवसात मिळणार आहे असे संजीव कुमार यांनी सांगितले.

परिस्थिती नियंत्रणात -रुग्णसंख्या वाढत असली तरी ९७ ते ९८ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. पालिकेने पहिल्या लाटांमध्ये चांगले काम केले आहे. आताही रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे. दिवसाला सुमारे १५ ते २० रुग्ण दाखल होत आहेत. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. पालिका आणि कोविड सेंटरमधील खाटा आजही रिक्त आहेत अशी माहिती संजीव कुमार यांनी दिली.

पावसाळ्यासाठी सज्ज -पावसाळ्यात विविध आजार डोके वर काढतात. त्यासाठी पालिकेने धूर फवारणी आणि औषध फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळी आजारासाठी पालिकेची रुग्णालये आणि दवाखाने सज्ज ठेवण्यात आली आहेत असेही संजीव कुमार यांनी सांगितले.

हेहीव वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ७०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद

Last Updated : Jun 3, 2022, 8:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details