महाराष्ट्र

maharashtra

Budget Of BMC 2022 : मुंबई मनपाचा आज अर्थसंकल्प! दिलेली आश्वासन पुर्ण करण्याची विरोधी पक्षांची मागणी

By

Published : Feb 3, 2022, 7:13 AM IST

आज मुंबईकरांच्या भविष्याबाबतचा निर्णय मनपाच्या आज होणाऱ्या अर्थसंकल्पावरू काही प्रमाणात ठरणार आहे. (The budget of BMC is being presented today ) आज अर्थसंकल्प सादर होत आहे. याबाबत बोलताना चांगल्या नागरी सोयी सुविधा देण्याचा आमचा मानस आहे अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. (Budget Of BMC 2022) दरम्यान, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुंबई मनपाचा आज अर्थसंकल्प!
मुंबई मनपाचा आज अर्थसंकल्प!

मुंबई - मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज (दि. 3 फेब्रुवारी)रोजी सादर होत आहे. याबाबत बोलताना चांगल्या नागरी सोयी सुविधा देण्याचा आमचा मानस आहे अशी (Mayor Kishori Pednekar) प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. (BMC budget will be presented today) दरम्यान, विरोधी पक्षनेते रवी राजा (BMC Opposition Leader Ravi Raja) यांनी नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर, दिलेल्या वचनाची सत्ताधारी पक्षाने पुर्तता करावी, अशी अपेक्षा भाजपाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सोयी सुविधा देण्याचा मानस -

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. (२०२१ - २२)चा अर्थसंकल्प ३९ हजार कोटींचा होता. आज याहून मोठा असलेला सुमारे ४१ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याबाबत बोलताना, मुंबईकरांना ५०० चौरस फुटांच्या घरासाठी मालमत्ता कर माफी देण्याबाबत शिवसेनेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. आता मुंबईकरांना मुबलक पाणी, प्रदूषणमुक्त हवामान, तसेच, दर्जेदार रस्ते , उद्याने, मैदाने, शिक्षण आणि आरोग्य सेवासुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे, घनकचरा विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे देण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. चांगल्या नागरी सुविधा, कोस्टल रोड आदी सुविधा देण्याचा आमचा मानस आहे असही पेडणेकर म्हणाल्या आहेत.

आवश्यक उपाययोजना करा -

मुंबईतील रखडलेली विकासकामे, प्रकल्प, धोरणे आदीबाबत ज्या अडचणी आहेत त्या दूर करून ती तातडीने मार्गी लावणे, मुंबईकरांना मुबलक पाणी देणे, चांगल्या आरोग्य सुविधा, रस्ते, शिक्षण देणे. मालमत्ता कर दात्याना अधिकाधिक सेवासुविधा देणे. आरोग्य सुविधा वाढविणे, त्यासाठी भरीव निधीची तरतूद करणे, प्रदूषणमुक्त, खड्डेमुक्त आणि पुरमुक्त मुंबई देणे यासाठी पालिकेने आवश्यक उपाययोजना करणे आदी बाबी यंदाच्या अर्थसंकल्पातून अपेक्षित आहेत असही विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.

वचनाची सत्ताधारी पक्षाने पुर्तता करावी -

यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वपक्षीय नगरसेवकांना समान निधीचे वाटप व्हायला हवे. ५०० चौरस फुटांच्या घरांना ज्याप्रमाणे मालमत्ता करमाफी दिली तशी ७०० चौ. फुटांच्या घरांनाही कर माफी देण्याबाबत भाजपने केलेल्या मागणीची पूर्तता करणे. दर्जेदार रस्ते, उद्याने, शिक्षण असावे. खड्डे मुक्त रस्ते असावेत, मराठी शाळा, भाषा यांचे संवर्धन व्हावे. मुंबईकरांना चांगल्या सेवासुविधा देणे. २४ तास पाणीपुरवठा करण्याबाबत दिलेल्या वचनाची सत्ताधारी पक्षाने पुर्तता करावी, अशी अपेक्षा असल्याचे भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Ramesh Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, अभिनयाचा देव हरपला

ABOUT THE AUTHOR

...view details