मुंबई- गुलशन कुमार हत्याकांड (Gulshan Kumar Murder) प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मारेकरी अब्दुल रौफ उर्फ दाउट मर्चंटची याचिका फेटाळली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं रौफला दिलेली जन्मठेपेची शिक्षा योग्य असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलंय. याशिवाय या प्रकरणातील दुसरा एक आरोपी अब्दुल राशिदची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यालाही उच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. हायकोर्टानं आज स्पष्ट सांगितलं की रौफला माफी दिली जाऊ शकत नाही. कारण पैरोलवर असताना तो बांग्लादेशमध्ये पळून गेला होता. बॉलिवूडमधील म्युझिक इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीत निर्माते गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील अंधेरी भागात एका मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
कधी झाली होती हत्या..
१२ ऑगस्ट १९९७ रोजी अंधेरीतील एका मंदिराबाहेर गुलशन कुमार यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. गायक नदीम यांच्या सांगण्यानुसार गुलशन कुमार यांची हत्या झाल्याचं म्हटलं जातं. बॉलिवूडमध्ये गुलशन कुमार यांचं नाव उंचावत होतं. त्यामुळे आपलं नाव खराब होईल, या भितीने ही हत्या करण्यात आली. या प्रकरणांमध्ये काही जणांना अटक देखील करण्यात आली होती. त्यापैकी काही लोकांवर खटला चालवण्यात आला होता.