मुंबई :घाटकोपर मधील 2019 मध्ये मृत, व्यक्तीच्या भावाने संशयित आरोपी संतोष माने (accused in the 2019 Ghatkopar murder case) विरोधात याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजुर करत असे निरीक्षण नोंदवले की, केवळ आरोपीवर 302 कलम नुसार गुन्हा दाखल आहे म्हणून, कोठडीत चौकशी करणे आवश्यक नाही, असे मत नोंदवत आरोपीला अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर (The Bombay High Court granted bail) केला आहे.
कथित गुन्हा तीन वर्षांपूर्वी घडला : संतोष माने यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. केवळ आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने त्याची कोठडीत चौकशी करणे आवश्यक नाही. या व्यक्तीला अटकेची कायदेशीर भीती अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी पुरेशी होती. कथित गुन्हा तीन वर्षांपूर्वी घडला होता. जेव्हा त्याची कथितपणे मर्यादित भूमिका होती, म्हणून तो अटक करण्यापासून संरक्षणास पात्र आहे असे खंडपीठाने म्हटले आहे.
घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : 20 मे 2019 रोजी या प्रकरणी मृत संजयचा भाऊ मनोज दुबे याने घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दुबे यांनी आरोप केला आहे की, 2017 मध्ये आरोपी संतोष माने याने त्याच्या चार साथीदारांसह आपण संजय असल्याचे समजून त्याच्यावर हॉकी स्टिक आणि तलवारीने हल्ला केला होता. दुबेच्या भावाने त्याला सांगितले होते की, त्याच्यात आणि मानेसह आरोपी लोकांमध्ये प्रचलित वैर आहे, ते त्याला कधीही संपवू शकतात. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये पोलीस माने यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
आरोपीची नेमकी भूमिका स्पष्ट नाही : माने यांनी उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन साठी धाव घेतली होती. त्यावेळी असे सांगण्यात आले होते की, या प्रकरणाचा तपास संपला असून सहआरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सत्तेच्या कटाची भूमिका त्याला कारणीभूत आहे, असे माने यांच्या वकील राजीव चव्हाण यांनी न्यायालयात युक्तीवादा दरम्यान म्हटले आहे. माने यांच्या सांगण्यावरून संजयवर प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप पोलिसांनी केला असला तरी, पुरवणी आरोपपत्रात त्यांची नेमकी भूमिका दिसून येत नाही.
न्यायमूर्ती डांगरे यांनी असे मत मांडले की, तिन्ही आरोपींनी प्राणघातक हल्ला केलेल्या व्यक्तीचा मृत्यू यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्यासाठी केला आहे, असा आरोपपत्रात कुठलेही उल्लेख दिसत नाही. त्यामुळे आरोपी मानेला 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.