महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजप पुढील 20-30 वर्षे सत्तेतून बाहेर जाईल याची शक्यता कमीच - प्रशांत किशोर - .BJP will not be out of power for the next 20-30 years - Prashant Kishor

ज्यांना असं वाटतं की भाजपाचा जशी सत्तेवर आली, तसाच तिचा पायउतार होईल, त्यांचं आकलन योग्य नाही, असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं. विरोधी पक्षांनी योग्य कृती केली नाही, तर पुढील अनेक दशकं भाजपाशी देशपातळीवर सामना करू शकेल असा पर्याय तयार होणार नाही, असा इशारा किशोर यांनी दिला.

भाजप पुढील 20-30 वर्षे सत्तेतून बाहेर जाईल याची शक्यता कमीच
भाजप पुढील 20-30 वर्षे सत्तेतून बाहेर जाईल याची शक्यता कमीच

By

Published : May 11, 2022, 7:10 AM IST

मुंबई - प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजप पुढील दोन ते तीन दशकं सत्तेतून बाहेर जाईल अशी शक्यता नाही असे म्हटले आहे. त्यांनी एकप्रकारे देशातील विरोधी पक्षांना गंभीर इशारा दिला आहे. “ज्यांना असं वाटतं की भाजपाचा जशी सत्तेवर आली, तसाच तिचा पायउतार होईल, त्यांचं आकलन योग्य नाही” असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं. विरोधी पक्षांनी योग्य कृती केली नाही, तर पुढील अनेक दशकं भाजपाशी देशपातळीवर सामना करू शकेल असा पर्याय तयार होणार नाही, असा इशारा किशोर यांनी दिला. ते मंगळवारी ‘ई-अड्डा’ या कार्यक्रमात बोलत होते.

प्रशांत किशोर नेमके काय म्हणाले - “ज्यांना असं वाटतं की भाजपाचा आलेख जसा वर गेला तसाच तो आपोआप खाली येईल, तर ते लगेच होणार नाही. दीर्घकाळाचा विचार केला तर तसं होऊ शकतं. मात्र, त्याचे दोन भाग आहेत. भाजपा पुढील अनेक दशकं भारतीय राजकारणात एक मजबूत पक्ष म्हणून टिकून राहील. एकदा का तुम्हाला भारताच्या स्तरावर ३० टक्के मतं मिळाली, त्यानंतर तुम्हाला कोणीही हटवू शकत नाही. ही स्थिती अशी नाही की ती आपोआप नाहीशी होईल.”

राजकारणाचा नेमका अर्थ काय - “याचा अर्थ भाजपा प्रत्येक निवडणूक जिंकेल असाही नाही. भारताच्या राजकारणात पहिले ४०-५० वर्षांचं राजकारण काँग्रेसभोवती होतं. तेव्हा तुम्ही काँग्रेससोबत असो किंवा तुम्ही काँग्रेसच्या विरोधात याने फरक पडला नाही. त्यानंतरच्या २०-३० वर्षात भारतीय राजकारण भाजपाच्या भोवती केंद्रीत झालं, मग तुम्ही भाजपासोबत असो किंवा भाजपाविरोधात. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की भाजपाचा आलेख आपोआप खाली येईल त्यांचं हे आकलन योग्य नाही,” असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं. प्रशांत किशोर पुढे म्हणाले, “मी असं म्हणतो आहे कारण तुम्ही भारतीय राजकारणाचे पहिले ५०-६० वर्षे पाहा. १९५०-१९९० या काळात १९७७ चा अपवाद वगळला तर भारतात असा एकही पक्ष नव्हता जो काँग्रेसला अखिल भारतीय पातळीवर आव्हान देऊ शकेल. त्यामुळे तशाच परिस्थितीला आता पुढील बरीच वर्षे सामोरं जावं लागू शकतं. जेव्हा विरोधी पक्ष विभागलेला असतो किंवा एकत्र येण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा मजबूत पक्षाचा सत्तेत असण्याचा कालावधी मोठा असू शकतो.”

हेही वाचा - Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी दिले नव्या पक्षाची स्थापना करण्याचे संकेत

ABOUT THE AUTHOR

...view details