मुंबई- गेल्या अनेक वर्षापासून विविध कारणांनी रखडलेला ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्णत्वास येत आहे. मध्य रेल्वेकडून शनिवार- रविवारी मेगाब्लॉक घेऊन काम करण्यात येत आहे. आता त्यामध्ये रेल्वेकडून ७२ तासाचा सर्वात मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ब्लॉक 5, 6 आणि 7 फेब्रुवारी असा असणार आहे. याबाबत अद्यापही रेल्वेकडून अधिकृत घोषणा केलेली नाही आहे.
सर्वात मोठा मेगाब्लॉक -
मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-२ (एमयुटीपी) मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. आता ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांना निधी, जागेचे नियोजन, नागरिकांचे पुनर्वसन अशा अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडला. तर, प्रकल्पांच्या कामांनी मार्च २०२१ पासून वेग धरला आहे. रखडलेला ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्णत्वास येत आहे. ठाणे ते दिवा दरम्यान सुमारे ९ किमी अंतराच्या दोन मार्गिकांना अंतिम स्वरूप दिले जात आहे. नुकताच पार पडलेल्या १४ तासांच्या ब्लॉकमध्ये एक नविन डाऊन जलद मार्गिका सुरू केली. या मार्गिकेवरून रेल्वे सेवा धावण्यास सुरुवात झाली आहे. तर, पुढील ब्लॉकमध्ये सहाव्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून 72तासाचा सर्वात मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ब्लॉक 5 , 6 आणि 7 फेब्रुवारी असा असणार आहे. ज्यामध्ये पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमधील अंतिम टप्प्यातील कामे केली जाणार आहेत. त्यानंतर प्रवाशांना ठाणे ते दिवा दरम्यान सहा मार्गिकेवरून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.