हैदराबाद ७५ व्या स्वातंत्र्यदिनी 75th independence day आझादी का अमृत महोत्सव २०२२ अंतर्गत हर घर तिरंगा अभियान साजरे केले जाते आहे. भारत सरकारने हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनी उत्साहाने हर घर तिरंगा मोहीमेत भाग घेतला आहे. 2022 च्या स्वातंत्र्य दिनाच्या या खास प्रसंगी देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांनीही मुंबईतील त्यांचा आलिशान बंगला अँटिलियाला तिरंग्याच्या रंगानी सजविले Antilia decorated with Tiranga आहे. तसेच ते आपल्या नातवासह व परिवारासह The Ambani family celebrated Independence Day स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकावितांना दिसत their grandson On India Independence Day आहे
तिरंग्यांच्या रोषणाईने सजलेला अंबानींचा हा बंगला पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. बंगला अतिशय आलिशान आणि सुंदर शैलीत सजवण्यात आला आहे. मुकेश अंबानींचा बंगला अँटिलियाला तिरंग्याच्या दिव्यांनी सजवलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ मुकेश अंबानींचे आलिशान घर अँटिलियाचा आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण अंबानी कुटुंब स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत आहे.याशिवाय अँटिलियाकडे जाणारे मार्गही तिरंग्याच्या दिव्यांनी सजवण्यात आले आहेत. अशोक चक्र देखील अनेक दिव्यांनी बनवले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना लोक मुकेश अंबानींचे कौतुक करत आहेत.