मुंबई -जितेंद्र नवलाने यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लूक आऊट नोटीस काढली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जितेंद्र नवलाने यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ईडी अधिकाऱ्यांसाठी व्यावसायिकांकडून वसुली करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता
फरार झाल्याचा संशय - जितेंद्र नवलानी हा परदेशात फरार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळेच नवलानी विरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात आरोप केले होते. त्यानंतर नवलानी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ईडी अधिकाऱ्यांवर वसुली करत असल्याचे आरोप केले होते. यावेळी त्यांनी जितेंद्र नवलानीचा उल्लेख केला होता. नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांसाठी वसूली करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवलानी विरोधात एफआयआर दाखल केला आहे. याबाबतची माहिती नवलानीला याआधीच देण्यात आली. त्यानंतर नवलानीने भारतातून पळ काढला असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.