ठाणे - विदेशात बसून भारतातल्या मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबईसह अन्य शहरातील व्यावसायिकांना आणि व्यापार्यांना खंडणीसाठी धमक्यां देणारा गॅंगस्टर आणि खंडणी किंग रवी पुजारीला अखेर कर्नाटक पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. रवी पुजारी याला आफ्रिकेतल्या सोनेगल येथून मागच्या वर्षी अटक करण्यात आली होती. नुकताच मुंबई पोलिसांनी रवी पुजारीला अनेक खंडणी, गोळीबारसारख्या गंभीर गुन्ह्याच्या चौकशीसाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून ताब्यात घेतले आहे. या पाठोपाठ आता ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतही असंख्य गुन्हे रवी पुजारीवर दाखल आहेत. त्याचा तपास करण्यासाठी आता ठाणे पोलिसांनी एजाज लकडवाला याच्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पार पडून रवी पुजारीलाही ठाणे पोलीस ताब्यात घेणार असल्याचे सूतोवाच गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे काही दिवसातच रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या कोठडीत येणार आहे.
हेही वाचा -सैनिक स्कूलच्या ५४ मुलांना कोरोनाची लागण; हरियाणाच्या करनालमधील घटना
गॅंगस्टर रवी पुजारीवर असंख्य गुन्हे दाखल
रवी पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, वाशी, कल्याण, उल्हासनगर, आदी ठिकाणी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्याच्या चौकशी करण्यासाठी रवी पुजारीला ठाण्यात आणणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून रवी पुजारीला ताब्यात घेतले तसेच ठाणे पोलीसही लवकरच न्यायालयाच्या आदेशाने रवी पुजारीला ठाण्यात आणतील अशी माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा -वनमंत्री पदासाठी कॉंग्रेसचा दावा नाही; नाना पटोले यांचे स्पष्टीकरण
उल्हासनगरच्या केबल व्यावसायिकाची हत्या
कोट्यावधींची खंडणी रवी पुजारीच्या हस्तकांनी पुजारीच्या आदेशावरून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन व्यापारी आणि व्यावसायिकाकडून वसूल करण्यात आली आहे. तर खंडणी देण्यास नकार देणाऱ्यावर गोळीबार करण्याचे प्रकारही घडले आहेत. रवी पुजारी गँगने आणि हस्तकांवर हत्या, हत्येचा प्रयास, खंडणी अशा गंभीर स्वरूपाचे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. उल्हासनगरमध्येही केबल व्यावसायिक सच्चिदानंद कारिरा याची हत्या रवी पुजारीच्या हस्तकांनी केली होती. तसेच बांधकाम व्यावसायिक सुमित चक्रवती यांच्या कार्यालयात घुसून गोळीबारही करण्यात आला होता. तसेच उल्हासनगरमध्येही खंडणीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी रवी पुजारीचा ताबा पोलिसांना आवशक्य आहे.
खंडणीचे सत्र अनेक वर्षापासून होते सुरू
मुंब्रा परिसरातील राकेश भगत या व्यवसायिका ला 15 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळच्या सुमारास ऑस्ट्रेलिया येथून रवी पुजारी यांनी मोबाईलवरून खंडणीच्या धमकीचा फोन केला होता. दोन कोटी दे नाहीतर ठार मारीन अशी धमकी त्याने भगत या व्यावसायिकाला दिली होती. विशेष म्हणजे पुन्हा 19 फेब्रुवारी रात्री फोन करून काय विचार केलास तुला मारण्यासाठी समोरचा तीन कोटी रुपये द्यायला तयार आहे. त्यानंतर पुन्हा 20 फेब्रुवारी 2018 ला फोन करून तू पैसे देत नाहीस आता तू गेला अशी धमकी देऊन फोन कट केला होता. या धमकी प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भगत यांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच ठाण्यात खंडणी आणि जमिनीच्या व्यवहारातही रवी पुजारी हस्तक्षेप करीत असल्याचे समोर आले होते. यामुळेच अशा गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी त्याचा ताबा ठाणे पोलिसांना आवशक्य असल्यानेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली आहे.