ठाणे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात नॉन बेलेबल अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांच्यासह 28 जणांवर खंडणी उकळण्याचा गुन्हा ठाणेनगर पोलिसांनी दाखल केला होता. त्यानंतर ते चौकशीस सतत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे आता ठाणे न्यायालयाने सिंगविरोधात वॉरंट काढले आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली असून, ते फरार घोषित होण्याच्या वाटेवर आहेत.
हेही वाचा -या कारणांमुळे आर्यनला मिळाला जामीन, मुकूल रोहतगी यांनी असा केला युक्तिवाद
- 29 जणांवर आहेत गुन्हे दाखल -
परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात भादवी ३८४, ३८६, ३८७, ३८९, ३९२, ३२४, ३२३, ५०६, ५०६(२), १६६, १०९, १२०(ब) आणि आयपीसी ३, २५, आर्म्स कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तब्बल २९ जणांचा समावेश आहे. प्रदीप शर्मा, पोलीस उपायुक्त पराग मणेरा, दीपक देवराज, एन. टी. कदम, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे माजी वरिष्ठ अधिकारी राजकुमार कोथीमिरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस कर्मचारी चौधरी, विकास दाभाडे, रितेश शहा, दिपल अग्रवाल, रवी पुजारी, संजय पुंनमिया, अनिल सिंग, बच्ची सिंग, जुबेर मुजावर, सुनील देसाई, मनीष शहा उर्फ चोटी, किशोर अग्रवाल, बरखा अग्रवाल, समाजसेवक बिनू वर्गीस, तारीख परवीन, देवा भानुशाली, अंकित भानुशाली, विशाल कारिया, प्रदीप सोदानी, प्रशांत कोठारी, दीपक कपूर, नागेश यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे कोपरी पोलीस ठाण्यातही परमबीर सिंग यांच्याविरोधात दोन कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ ए, ३४, १२० बी नुसार दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तक्रारदार केतन तन्ना आणि रियाज भाटी यांनी पोलीस ठाण्यात जबाबही नोंदवले होते.
- काय आहे प्रकरण?