मुंबई -मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वादात अडकलेल्या मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वझे यांची 12 मार्चला नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. सचिन वझे संदर्भातल्या अनेक घडामोडी आज घडल्या आहेत. सचिन वझे यांचे व्हॉटसअॅप स्टेटस व्हायरल झाले आहे. त्यात त्यांनी जगापासून निरोप घेण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे. तसेच वझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे कोर्टाने नकार दिला आहे.
सचिन वझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे कोर्टाचा नकार
संभाव्य अटक टाळण्यासाठी कोर्टात गेलेले वझे यांना दिलासा मिळू शकलेला नाही. सचिन वझे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज नकार दिला. वझे यांच्या अर्जावर आता १९ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
हेही वाचा -मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वाझे अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात