मुंबई - (Andheri East Assembly By Election ) सध्या राज्यभरात अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली असतानाच आता या निवडणुकीत "बाळासाहेबांची शिवसेना" पक्षाने देखील उडी घेतली आहे. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" पक्षाच्या अधिकृत उमेदवार शिवसेनेच्या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आहेत. त्यांनी शिंदेगटाकडून निवडणूक लढवावी असा शिंदे गटाकडून दबाव टाकला ( Shinde group to pressure on Rituja Latke ) जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे.
शिंदे गटाकडून दबाव - महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ऋतुजा लटके यांना घोषित देखील केलं गेले. मात्र ऋतुजा लटके यांना एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून उमेदवारी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच ऋतुजा लटके यांना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी घ्यावी, यासाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" या पक्षाकडून केला जातोय.