महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis : ठाकरे सरकारने जाताना घेतलेले निर्णय अवैध; देवेंद्र फडणवीसांची टीका

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. तसेच, ठाकरे सरकारने अल्पमतात असताना कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय अवैध आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली ( Thackeray Government Cabinet Decision Invalid Say Devendra Fadnavis ) आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : Jun 30, 2022, 6:52 PM IST

मुंबई - उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल, अशी शक्यता होती. मात्र, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार ( Eknath Shinde Maharashtra New CM ) आहे. याबाबतची घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केली आहे. तसेच, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने ( Thackeray Goverment ) अल्पमतात असताना कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय अवैध ठरतात. तरीही त्यातील बऱ्याच निर्णयांशी आम्ही सहमत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील बड्या सत्तातंरावर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद ( Thackeray Government Cabinet Decision Invalid Say Devendra Fadnavis ) घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

"ते निर्णय आम्हाला घ्यावे लागणार" - देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आघाडीने विकासाची कामे केली नाही, भ्रष्टाचार केला. राज्याच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचारात जेलमध्ये जाणे ही खेदजनक बाब होती. बाळासाहेबांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला, मात्र त्याच्याशी संबंधित असलेले मंत्री तुरुंगात जातो. शेवटच्या दिवशी संभाजी नगर झाले. राज्यपालांचं पत्रं आल्यावर कॅबिनेट घ्यायची नसते. तरीही कॅबिनेट घेऊन संभाजीनगर, धाराशीव, दिबा पाटील यांचे नामकरणाचं निर्णय घेतले. अर्थात हे निर्णय आमच्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहे. कारण ते वैध मानले जाणार नाही. पण ते आम्ही घेऊ.

"अडीच वर्ष प्रगती झाली नाही" -2019 मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले. त्यावेळी आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मोठा विजय मिळाला. महाविकास आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना युती) सरकारमधून बाहेर पडा, असे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सांगत होते. पण, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे ऐकले नाही. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला अशा लोकांना घेऊन सरकार स्थापन केले. अडीच वर्षे प्रगती झाली नाही. उद्धव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार चालले. महाविकास आघाडी सरकारवर शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरेंवर नाराज होते, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

"मी सरकारचा भाग नाही पण..." -आमचे 106 आणि इतर अपक्ष व एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे 39 व त्यांना समर्थन देणारे इतर अपक्ष असे एकूण मिळून 170 हुन अधिक सदस्यांचा पाठिंबा आमच्या सरकारला आहे. हे पूर्ण बहुमत आपले सरकार लवकरच आपल्या सेवेत येईल. या सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे करतील. मी या सरकारच्या मंत्रिमंडळाचा भाग नसेल, पण या सरकारला माझे पूर्ण सहकार्य असेल, असे फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा -Eknath Shinde Maharashtra CM : शिवसेना शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details