महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

vedanta semi conductor project वेदांता प्रकल्प गुजरातला पळवल्याचा ठाकरेंचा आरोप, मुंबई पालिका भ्रष्टाचारावरून भाजपचा पलटवार

महाराष्ट्रात वेदांता सेमी कंडक्टर प्लांट (vedanta semi conductor project) येऊ घातला असतानाच आता हा प्लांट गुजरातला जाण्याची (vedanta semi conductor plant gujrat) शक्यता आहे. यासंदर्भात सुमारे 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प अन्य राज्यात वळवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी केला आहे. मात्र, या आरोपात तथ्य नसून ठाकरे परिवाराने आधी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची (bmc coruption) उत्तरे द्यावीत, असा पलटवार भाजपाचे आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी केला आहे.

vedanta semi conductor project
वेदांता प्रकल्प गुजरातला पळवल्याचा ठाकरेंचा आरोप, मुंबई पालिका भ्रष्टाचारावरून भाजपचा पलटवार

By

Published : Sep 13, 2022, 8:10 PM IST

मुंबईमहाराष्ट्रात वेदांता सेमी कंडक्टर प्लांट (vedanta semi conductor project) येऊ घातला असतानाच आता हा प्लांट गुजरातला जाण्याची (vedanta semi conductor plant gujrat) शक्यता आहे. यासंदर्भात सुमारे 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प अन्य राज्यात वळवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी केला आहे. मात्र, या आरोपात तथ्य नसून ठाकरे परिवाराने आधी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची (bmc coruption) उत्तरे द्यावीत, असा पलटवार भाजपाचे आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी केला आहे. हा प्रकल्प आता गुजरातला जात असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी एका ट्विटद्वारे हा प्रकल्प गुजरातला जात असल्याचे संकेत दिले आहेत.

काय होता प्रकल्प ?भारतात सुरू असलेल्या ऑटोमोबाईल आणि स्मार्टफोन उद्योगांमध्ये अत्याधुनिक अशा सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. मात्र, सध्या भारतात या सेमी कंडक्टरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातच सेमीकंडक्टर तयार व्हावेत. यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्रात पुण्याजवळ उभारण्यात येणार होता. यासंदर्भात तत्कालीन महाराष्ट्र सरकारने अनेक बैठका घेतल्या होत्या. तैवानमधील फॉक्सकॉन आणि खनिकर्म क्षेत्रातील वेदांता या कंपन्यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात सेमी कंडक्टर प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला होता. आता हा प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत झाल्यात जमा आहे.

वेदांता प्रकल्प गुजरातला पळवल्याचा ठाकरेंचा आरोप, मुंबई पालिका भ्रष्टाचारावरून भाजपचा पलटवार

सत्तांतरानंतर बैठकतैवानमधील फॉक्सकॉन आणि भारतामधील वेदांता समूहाबरोबर सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासंदर्भात शिंदे - फडणवीस यांचीही एक बैठक सत्ता आल्यानंतर झाली होती. या बैठकीसंदर्भात एमआयडीसीने (midc) आपल्या ट्विटर हँडल वरून 26 जुलै 2022 रोजी बैठक पार पडल्याची आणि महाराष्ट्रात आता लवकरच लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचे म्हटले होते.

अगरवाल यांची ट्विटद्वारे माहितीवेदांता समूहाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी ट्विटद्वारे नुकतीच फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट गुजरात मध्ये उभारणार असून यामुळे आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅलीचे स्वप्न साकारण्यास मदत होईल. असे म्हटले आहे. तसेच भारताची सिलिकॉन व्हॅली आता एक पाऊल दूर आहे असेही अग्रवाल यांनी संकेत दिल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवला.

आधी महापालिकेतील भ्रष्टाचाराची उत्तरे द्या- लाडदरम्यान, या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना विचारले असता त्यांनी असा कुठलाही प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेलेला नाही. आणि महाराष्ट्रात येणारा प्रकल्प राज्यशासन बाहेर पाठवणार नाही. असा दावा केला. त्याआधी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने मुंबई महानगरपालिकेतील गेल्या दोन वर्षातील भ्रष्टाचाराची उत्तरे द्यावीत. बारा हजार कोटी रुपयांचा भुर्दंड शासनाला कशासाठी बसला, त्याचे उत्तर द्यावे असा प्रतिटोला लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details