मुंबई - आरोग्य सेवा भरतीचा घोळ चव्हाट्यावर आल्यानंतर राज्य सरकारची इभ्रत वेशीवर टांगली गेली. विरोधकांनी यावरुन सत्ताधाऱ्यांना टीकेचे धनी बनवले. आता आरोग्य विभाग आणि टीईटीची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. दोन्ही परीक्षा एकत्र येणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्य शासनाने या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसारमध्यमांना दिली.
राज्यातील आरोग्य विभागाच्या गट 'क' व 'ड' पदासाठीच्या परीक्षा शुक्रवारी अचानक रद्द करण्यात आल्या. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा रद्द केल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रकरणात महाघोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीसह आरोग्य मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांची थर्ड पार्टीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली. हे प्रकरण ताजे असतानाच, भरतीसाठी लाखोंची बोली लावली जात असल्याची संभाषण क्लीप ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी बाहेर आणली. प्रकरण गंभीर असून त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शेंडगे यांनी केली आहे.
आरोग्य विभाग व टीईटी परीक्षा एकाच दिवशी -
राजेश टोपे यांनी सांगितले की, आरोग्य विभाग आणि (शिक्षक पात्रता परीक्षा) टीईटीची परीक्षा 31 ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी यासंदर्भात बोललो आहे. त्यांना विनंती केली असून आरोग्य विभाग आणि टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत शासनाने विचार करावा, अशी विनंती मंत्री गायकवाड यांच्याकडे केल्याचे टोपे यांनी सांगितले. शिक्षण संचालकांनाही यावर तोडगा काढण्यास सांगणार आहे. एक महिना अजून बाकी आहे, तोपर्यंत या समस्येतून मार्ग काढला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थाचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेईल अशी ग्वाही टोपे यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या परीक्षांमुळे टीईटी परीक्षा लांबणीवर? आरोग्य मंत्र्यांची माहिती - आरोग्य विभाग भरती परीक्षा
आरोग्य विभाग आणि टीईटीची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. दोन्ही परीक्षा एकत्र येणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्य शासनाने या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसारमध्यमांना दिली.
हे ही वाचा -अजित पवारांच्या अडचणी वाढणार? जरंडेश्वर कारखाना ताब्यातून जाणार? किरीट सोमय्या लक्ष घालणार
तातडीने पंचनामे -
जूनपासून आतापर्यंत 3 ते 4 वेळा पाऊस जोरदार झाला. जालना जिल्ह्यातील अनेक तालुक्यात, जोरदार पाऊस झाला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या आठवडाभरात पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचनाही मदत व पुनर्वसन विभागाने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या भागात मुसळाधार पर्जन्यवृष्टी झाली त्या भागात सरसकट पंचनामे करण्यात येतील, असे टोपे म्हणाले.