पालघर -पालघर मनोर येथील देवीकृपा हॉटेल परिसरामध्ये भरधाव ट्रकने 3 वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात गणेश नगर येथील एका पिता व 4 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर इतर 3 जण जखमी आहेत. सदरील अपघात हा ट्रक ड्रायव्हर हा मद्यपान करून, दारूच्या नशेत ट्रक चालवत असल्याने सदर अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दारू पिऊन भरधाव ट्रक चालवणाऱ्या चालकाने चुकीच्या दिशेने ट्रक भरधाव नेत पिता पुत्रीच्या मोटर सायकलवर जोरदार धडक दिली व त्यात पित्यासह मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
Terrible accident : ट्रकच्या भीषण अपघातात, बाप लेकीचा जागीच मृत्यू तर 3 जखमी - पालघर पोलीस
Terrible accident : देवीकृपा हॉटेल परिसरामध्ये भरधाव ट्रकने 3 वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात गणेश नगर येथील एका पिता व 4 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर इतर 3 जण जखमी आहेत. या भीषण अपघाताचा पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत.
ट्रक चालकाने पिता, पुत्रीला धडक दिल्यानंतर या ट्रकने पुढे उभ्या असलेल्या एका चार चाकी वाहनास व दुचाकी वाहनालाही धडक दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत इतर 3 जण जखमी झाल्याचे समजत आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळतात पालघर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृत पिता व त्याच्या मुलीला शवविच्छेदनासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बाप- लेकीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या मद्यधुंद ट्रक चालकाला चोप देऊन त्याला पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या भीषण अपघाताचा पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत.