मुंबई -बच्चे कंपनी आणि पर्यटकांचे राणीबाग ( Ranibagh ) हे आवडते ठिकाण. राणीबागेत पेंग्विन, पक्षी आणि प्राणी बघायला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याच राणीबागेत ४४ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारले जाणार होते. मात्र मत्सालय ( Aquarium ) उभारण्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. यावर भाजपाकडून ( BJP ) टीका करण्यात आली आहे.
Fish Aqueriam Ranibagh Cancelled : राणीबागेत मत्सालय उभारण्याची निविदा रद्द - BJP
बच्चे कंपनी आणि पर्यटकांचे राणीबाग ( Ranibagh ) हे आवडते ठिकाण. राणीबागेत पेंग्विन, पक्षी आणि प्राणी बघायला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याच राणीबागेत ४४ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारले जाणार होते. मात्र मत्सालय ( Aquarium ) उभारण्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. यावर भाजपाकडून ( BJP ) टीका करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयासाठी निविदा -बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आधुनिकीकरण पूर्ण होवून त्यात एकापाठोपाठ आकर्षणाची भर पडते आहे. राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार या प्राणिसंग्रहालयात वेगवेगळी वैशिष्ट्ये समाविष्ट केली जात आहेत. विशेषतः पेंग्विन प्रदर्शनी सुरू झाल्यानंतर पर्यटकांची प्राणिसंग्रहालयात रोज मोठी झुंबड उडते आहे. सोबतीला नव्याने दाखल झालेले विविध वन्य पशुपक्षी, प्राणी याठिकाणी पाहायला मिळत असल्याने पर्यटकांसाठी येथील रपेट ही नेहमीच पर्वणी ठरत आली आहे. पर्यटक, निसर्गप्रेमी आणि खास करून लहान मुले व विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता महानगरपालिकेने या ठिकाणी ४४ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाची उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
राणीबागेतील पेंग्विन प्रदर्शनी जवळच सुमारे सहाशे चौरस मीटर जागेवर हे मत्स्यालय उभारण्यात येणार होते. यामध्ये घुमटाकार (dome) स्वरूपाच्या प्रवेश मार्गाने शिरतांना तेथे जणू समुद्रात उतरून मत्स्य जीवन आणि जल वैविध्य (aquaculture) पाहत असल्याचा अनुभव आला असता. तेथून पुढे बोगद्यासारख्या (tunnel shape) गोलाकार पद्धतीने दोन भागात मत्स्यालय उभारण्यात येणार होते. पैकी १४ मीटर लांबीच्या एका भागात प्रवाळ मत्स्य (coral fish) तर ३६ मीटर अंतराच्या दुसऱ्या भागात विविध मासे आणि समुद्रातील जल परिस्थितीकी (deep ocean aquaculture) पाहता येणार होते. खास करून बच्चे कंपनीला ३६० अंशात गोलाकार फिरून अगदी जवळून मासे आदी पाहता येतील, अशी 'पॉप अप विंडो' उपलब्ध करून दिली जाणार होती. मत्स्यालयात फिरताना चौकोनी आकाराचे ४, गोल आकाराचे ५ आणि अर्ध गोलाकार २ अशा एकूण ११ आधुनिक स्वरूपाच्या मत्स्य कुंडामध्ये (fish tank) रंगबिरंगी स्वरूपाचे मासे देखील पाहता येणार होते. या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे मिळणारा अनुभव पाहता हे मत्स्यालय म्हणजे लहान मुले आणि विद्यार्थ्यांसाठी समुद्री जीवनाबाबत सहज सोप्या पद्धतीने शिक्षण देणारे केंद्र ठरणार होते. संपूर्ण मत्स्यालयाची बांधणी आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे केली जाणार होती. मात्र ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे. निविदा रद्द का करण्यात आली त्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपने या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
भाजपची टीका -राणीबागेत मत्सालय उभारण्यासाठी निविदा रद्द केल्यावर भाजपा नेते व माजी मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ट्विट करत टीका केली आहे. राणीबागेत पर्यटकांसाठी मत्सालय उभारले जाणार होते. ते सोईची असले तरी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात मत्सालय उभारण्याचे कंत्राट पालिकेकडून रद्द करण्यात आले आहे. युवराजांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत दूध डेअरीच्या जागेवर मत्सालय उभारले जाणार आहे. यासाठी राणीबागेतील मत्सालयाची निविदा रद्द करण्यात आली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे. पर्यटकांनो मत्सालय पाहण्यासाठी राणीबाग नाही तर वाट वाकडी करून वरळीत चला. फक्त माझा मतदार संघ माझी जबाबदारी अशी टीका शेलार यांनी केली आहे.
काय लिहिले आहेत ट्विटमध्ये -पर्यटकांसाठी सोईची असले तरी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात मत्सालय उभारण्याचे कंत्राट पालिकेकडून रद्द केले आहे. सबब, युवराजांच्या वरळीत होणार म्हणून राणी बागेत नको पर्यटक हो, यापुढे राणी बाग नाही, वाट वाकडी करुन चलो वरळी! फक्त माझा मतदार संघ माझी जबाबदारी!! अशी टीका ट्विटद्वारे करण्यात आली आहे.