महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 24, 2022, 7:20 PM IST

ETV Bharat / city

Mumbai Ganeshotsav 2022 गणेशोत्सवासाठी १० हजार पोलिसांचा फौजफाटा, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर मुंबईत Mumbai Ganeshotsav 2022 वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहे. सुमारे १० हजार पोलीस Ten Thousand police force अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड, नागरी संरक्षण दलाचे जवान यांच्यासह, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते वाहतुक नियंत्रित करण्यासाठी तैनात system ready to avoid traffic jams असतील, असे वाहतूक पोलिसांनी Mumbai Traffic Police म्हणटले आहे.

Mumbai Ganeshotsav 2022
मुंबईत गणेशोत्सवासाठी पोलिस सज्ज

मुंबईमुंबईतील गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या कधीच न संपणारी आहे. त्यातच गणेशोत्सव कालावधीत Mumbai Ganeshotsav 2022 ठिकठिकाणी बांधण्यात आलेले मोठे मंडप, बाप्पाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकादरम्यान नागरिकही मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने, वाहतूक कोंडीत अधिक भर पडते. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीत मुंबईकर अडकू नयेत, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी आतापासूनच कंबर कसली आहे. सुमारे १० हजार पोलीस Ten Thousand police force अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड, नागरी संरक्षण दलाचे जवान यांच्यासह, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते वाहतुक नियंत्रित करण्यासाठी तैनात system ready to avoid traffic jams असतील, असे वाहतूक पोलिसांनी Mumbai Traffic Police म्हणटले आहे.


वाहतूक पोलिस सज्जमुंबईत इतर शहरांच्या तुलनेत गणेशोत्सवाची लगबग आणि धामधुम अधिक प्रमाणात असते. पहिल्या दिवसांपासून अनंत चतुर्दशीपर्यंत मुंबईकरांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुंबईतील गणपती पाहण्यासाठी गर्दी करतात. वाहनांची संख्या वाढल्याने मुंबईत नेहमीच वाहतूक कोंडी होत असते, त्यातच गणेशोत्सवामुळे ही कोंडी अधिक वाढते. भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच कोंडीमुळे खोळंबा होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस सज्ज झाले आहेत.

वाहतूक पोलिसांच्या वतीने नियंत्रण कक्ष १०६४४ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड, आर. एस. पी, नागरी संरक्षण दलाचे जवान तैनात असतील. त्याप्रमाणे या कामात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची देखील मदत घेण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन, गणेश घाट पवई या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या वतीने नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.


काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच १ सप्टेंबर, ४, ५, ६ संप्टेंबर आणि अनंत चतुर्दशीला ९ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुका असल्याने, वाहतूक पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. या दिवसांमध्ये विसर्जन ठिकाणांजवळील काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत, तर काही मार्ग एकदिशा करण्यात आले आहेत.


विसर्जनाच्या दिवसांसाठी नियोजन
७४ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
५४ रस्ते एक दिशा मार्ग
५७ रस्त्यांवर मालवाहू वाहनांना बंदी
११४ ठिकाणी नो पार्किंग झोन

हेही वाचाTanha Pola 2022 नागपूरसह पूर्व विदर्भात तान्हा पोळ्याची धूम, लाकडी नंदी बैलांची विक्री जोरात

ABOUT THE AUTHOR

...view details