महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वे प्रवाशांसाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था - बृहन्मुंबई महानगरपालिका

रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने मुंबईत सखल भागात पाणी साचले असून, रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांची 145 शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकावर अडकलेले प्रवासी

By

Published : Sep 4, 2019, 6:59 PM IST

मुंबई -सोमवारपासून शहरात पुन्हा पावसाची सुरुवात झाली आहे. रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने मुंबईत सखल भागात पाणी साचले असून, रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांची 145 शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकावर अडकलेले प्रवासी


संततधार पावसामुळे मध्य व पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवासी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकांवर अडकले आहेत. या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या शाळांमध्ये पिण्याचे पाणी, सतरंजी, बसण्यासाठी खुर्ची आणि बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व शाळांमध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी

शाळांची आणि रेल्वे स्थानकांची नावे -
१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ व नऊच्या प्रवेश द्वारासमोर समोर आणि जीपीओच्या (मोठे पोस्ट ऑफिस) समोर असणारी मनमोहन दास मनपा शाळा
२) मशिद रेल्वेस्थानकाजवळ जेआर मनपा उर्दू शाळा
३) मरीन लाईन्स स्टेशन जवळ श्रीकांत पाटेकर मार्गावर चंदनवाडी मनपा शाळा
४) मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ गिल्डर लेन हिंदी मनपा शाळा
५) ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ जगन्नाथ शंकर शेठ मनपा शाळा
६) भायखळा स्थानकाजवळ सावित्रीबाई फुले मनपा हिंदी शाळा
७) मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकाजवळ व हाफकिन इन्स्टिट्यूटच्या बाजूला असणारी बारादेवी मनपा शाळा
८) लोअर परेल पश्चिम व करी रोड पश्चिम या दोन्ही रेल्वे स्थानकांजवळ ना.म. जोशी मार्गावरील नामजोशी मनपा शाळा आणि साळसेकरवाडी येथील मनपा शाळा
९) दादर पश्चिम परिसरात रेल्वेस्थानकाजवळ कबूतर खाना जवळ असणारी भवानी शंकर मनपा शाळा आणि पोर्तुगीज चर्च जवळ "गोखले रोड मनपा शाळा क्रमांक दोन"
१०) दादर पश्चिम व माटुंगा पश्चिम परिसरात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जवळ असणारी "दादर वूलन मिल मनपा शाळा"
११) माहीम स्टेशन जवळ सोनावाला अग्यारी लेन दत्तमंदिर मैदानाजवळ असणारी मोरी रोड मनपा शाळा
१२) वांद्रे पूर्व परिसरात खेरवाडी मनपा शाळा
१३) सांताक्रूझ पूर्व स्टेशन जवळ वाकोला मनपा हिंदी शाळा आणि कलिना मनपा हिंदी शाळा
१४) अंधेरी पश्चिम परिसरात टाटा कंपाउंड मनपा शाळा
१५) बोरिवली पश्चिम परिसरात प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात जवळ "सोडावला लेन मनपा शाळा"
१६) बोरिवली पूर्व परिसरात दत्तपाडा मनपा शाळा आणि कस्तुरबा क्रॉस लेन मनपा शाळा क्रमांक 2
१७) घाटकोपर पश्चिम परिसरात साई नगर मनपा मराठी शाळा क्रमांक 2, बरवे नगर मनपा शाळा, तर पूर्वेला पंतनगर मनपा शाळा
१८) गोवंडी स्टेशन जवळ देवनार कॉलनी मनपा शाळा

ABOUT THE AUTHOR

...view details