मुंबई - रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार करण्याची सुविधा नसतानाही रुग्णाला भऱती करणे भाटिया रुग्णालयाला महाग पडले आहे. या रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेले तीन रुग्ण दाखल होते. त्यांच्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. या रुग्णालयातील आणखी 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णालयातील कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 35 वर पोहचली आहे.
भाटिया रुग्णालयातील आणखी 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, संख्या 35 वर
रुग्णालयातील आणखी 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णालयातील कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 35 वर पोहचली आहे.
मुंबई महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या हद्दीत ताडदेव येथे भाटिया रुग्णालयात आहे. या रुग्णालयात तीन रुग्ण इतर उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात हे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 70 कर्मचाऱ्यांची कोरोनाबाबत तपासणी करण्यात आली. त्यात 25 कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे सामोर आले होते. आता पुन्हा आणखी 10 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे या रुग्णालयातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 35 झाली आहे. या आधी केईएम रुग्णालयातील डॉक्टर, आया, सुश्रुषा हॉस्पिटलमधील नर्स आदी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे रुग्णालय तातपुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे.