मुंबई - केंद्रातील भाजपाविरुद्ध विरोधक एकटवत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता मोदी सरकारविरुद्ध वज्रमुठ आवळायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ( k chandrashekar rao ) हे भेटणार ( Telangana Cm Kcr To Meet Maharashtra Cm Uddhav Thackeray ) असल्याचे माहिती मिळत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना निमंत्रण दिले असून हे दोघे जण 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत भेटणार असल्याची माहिती आहे. संघराज्याचा न्यायासाठी सीएम केसीआर यांनी सुरू केलेल्या लढ्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे
गेल्या काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव हे केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपाविरोधात आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच आपण लवकरच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. गेल्या महिनाभरापासून आम्ही काम करत आहोत आणि 2024 च्या निवडणुका एकत्र लढण्यासाठी सर्व विरोधकांची स्वतंत्र आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते.