मुंबई- देशात भाजपाविरोधी वातावरण तयार ( Wave against BJP in India ) होत आहे. या वातावरणाचा फायदा घेत भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याची हीच वेळ असल्याचे मत देशातील तमाम विरोधकांचे झाले ( opposition front against Modi gov ) आहे. यासाठी विविध राज्यांतील प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन सामुहिक प्रयत्न करण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचाच भाग म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (के. सी. आर. ) आणि उद्धव ठाकरे यांची भेटही असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे येत्या 20 तारखेला महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांच्या भेटीसाठी ( Telangana Chief Minister to meet Uddhav Thackeray ) येणार आहेत. केसीआर यांनी लवकरच मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर केसीआर आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा-Rajnath Singh Fell on stage :...आणि मंचावरच कोसळले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
ठाकरे आणि केसीआर यांच्यात दुरध्वनीवरून संभाषण
मोदी सरकारच्या व्यक्तीविरोधी धोरणांचा विरोध आणि देशाच्या संघराज्य पद्धतीच्या संरक्षणासाठी केसीआर हे केंद्राविरोधात आंदोलन करणार ( KCR to protest against central gov ) आहेत. याबाबत ठाकरे आणि केसीआर यांच्यात झालेल्या दुरध्वनीवरील संभाषणात ठाकरे यांनी केसीआर यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविल्याने या भेटीचे महत्त्व विशेष वाढले आहे.
हेही वाचा-स्टेशनरी घोटाळ्याचा चौकशी अहवाल महापौरांना सादर, ५ ते ६ कोटींचा घोटाळा असण्याची माहिती
विरोधकांची स्वतंत्र आघाडी तयार करण्याचा प्रयत्न
भाजपविरोधात देश पातळीवर आघाडी उघडण्यासाठी अधिक वेगाने काम करण्याची गरज असल्याचे केसीआर यांनी नुकतेच म्हटले होते. यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ( Sanjay Raut on KCR meeting ) या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. "आम्ही गेल्या महिनाभरापासून काम करत आहोत. २०२४ च्या निवडणुका एकत्र लढण्यासाठी सर्व विरोधकांची स्वतंत्र आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते.
हेही वाचा-Vardayini mata : वरदायिनी मातेला चक्क डॉलरची आरास, अमेरिकेतील भक्ताने दिले दान
देशाला तिसऱ्या आघाडीची गरज
यासंदर्भात बोलताना वरिष्ठ राजकीय विश्लेषक रविंद्र आंबेकर यांनी सांगितले की, भाजपाच्याविरोधात केसीआर यांनी कॉंग्रेसचे जोरदार समर्थन केले आहे. राहुल गांधी यांच्या वडिलांसदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा केसीआर यांनी कॉंग्रेसपेक्षा अधिक तीव्रतेने समाचार घेतला. देशाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे. त्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याशी मोट बांधण्याबाबत ते तयारी करत आहेत. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही, तिथे अधिक प्रकर्षाने उठाव करण्याची गरज आहे. त्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा महणून ते कॉंग्रेसवरही दबाब आणत असल्याचे मत आंबेकर यांनी व्यक्त केले.
रविवारी होणाऱ्या बैठकीने भाजप अडचणीत येणार
भाजपाचा वारू देशभरात उधळला आहे. मात्र त्याला आता कुठेतरी खिळ बसते आहे. जे मित्र ते मिळवत होते किंवा जे तटस्थ पक्ष होते तेच भाजपच्या विरोधात आहेत. केसीआर राष्ट्रीय पातळीवर काही करत असतील तर त्याला बळ देण्यासाठी ही परिस्थीती योग्य असल्याचे मत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार तुळशीदास भोईटे यानी व्यक्त केले. आहे. दक्षिण भारत हा नेहमीच भाजपासाठी मिशन इम्पॉसिबल राहिलेला आहे. रविवारी होणारी ठाकरे आणि केसीआर यांच्या बैठकीने भाजप अडचणीत येणार आहे.
मुंबई मनपा निवडणुकीसाठीही ही भेट महत्त्वाची ठरणार
कर्नाटकातून दैवेगौडा यांनी केलेले समर्थन महत्त्वाचे आहे. एनटी रामाराव यांनी भारत देसमचा प्रयोग केला होता. तो फसल्यानंतर त्यातील एक गठ्ठा सीमावर्तीय लोक शिवसेनेकडे आले होते. भाजपच्याविरोधात मोर्चा उभा राहिल्यास विरोधकांना आणि त्या पक्षांना मनोबल मिळणार आहे. मुंबई मनपा निवडणुकीसाठीही ही भेट महत्त्वाची ठरणार असल्याचे भोईटे सांगतात. कारण मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये या भेटीचा फरक पडू शकतो. सायन कोळीवाडा , वरळी, कामाठीपूरा, अशा अनेक भागात याचा फायदा होवू शकतो, असे मत राजकीय विश्लेषक भोईटे यांनी व्यक्त केले आहे.