मुंबई - मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. कालपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजारी असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्या, तरी ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणाला गर्दी पाहायला मिळत आहे. आजही अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्या. अनेकवेळा अॅप सुरू होऊन बंद होत असल्याने लसीकरणादरम्यान अडचणी येत आहेत.
हेही वाचा -इतिहासात पहिल्यांदाच अंगारकी चतुर्थीला 'दगडूशेठ' गणपती मंदिर बंद
अॅपमध्ये तांत्रिक अडचणी -
मुंबईत कालपासून म्हणजेच 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजारी असलेल्या नागरिकांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली. काल सकाळपासून 3 खासगी रुग्णालय, 4 कोविड सेंटर आणि सेव्हन हिल रुग्णालयात लसीकारणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने काही ठिकाणी सकाळी 11 नंतर तर काही ठिकाणी दुपारी 12 ते साडेबारा नंतर लसीकरणाला सुरुवात झाली. घाटकोपर येथील हिंदू महासभा रुग्णालयात तर तब्बल साडे सहा तासानंतर म्हणजेच दुपारी 3.30 नंतर लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने ज्येष्ठ नागरिक व विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आज दुसऱ्या दिवशीही कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरण उशिरा सुरू झाले. आजपासून महापालिका आणि सरकारी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली. महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातही अशीच गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक व्हील चेअरवर बसून लसीकरणाला अनेक ज्येष्ठ नागरिक आले होते.
हेही वाचा -कोरोनावर भारतीय मसाले गुणकारी, 'या' मसाल्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली मागणी