मुंबई -२ एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनाला आता आठवडा उलटून गेला आहे. एकंदरीत दहिसर ते डी एन नगर व दहिसर ते अंधेरी या मेट्रो मार्गिका सुरू झाल्या असल्या तरी यामध्ये काही तांत्रिक त्रुटी सुद्धा सुरुवातीला दिसून आल्या आहेत. या मेट्रो मागील सोमवारपासून पूर्णपणे कार्यान्वित झालेल्या असून काही तांत्रिक बिघाडामुळे सुरुवातीला ३ दिवसांत ३ वेळा मेट्रो सेवा बंद पडली. या कारणास्तव प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागला.
प्रवाशांनी दिलेली प्रतिक्रिया मेट्रो स्थानक व पश्चिम रेल्वे स्थानक कनेक्टिव्हिटी नाही : दहिसर पूर्व ते डहाणूकर वाडी या दरम्यान असलेली मेट्रोची स्थानके ही पश्चिम रेल्वेच्या स्थानकापासून बऱ्याच अंतरावर असल्याने मेट्रो स्थानक व जवळ असणारे पश्चिम रेल्वे स्थानक यामधील अंतर कापण्यासाठी प्रवाशांना दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रिक्षा किंवा पाई प्रवास करावा लागत आहे. या कारणामुळे सुद्धा मेट्रोला संथगतीने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. दुसरे याचे महत्त्वाचे कारण आहे, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या ट्रेन फ्लॅटवर आल्यानंतर स्क्रीन दरवाजे उघडताना काही तांत्रिक अडचणी सुरुवातीला आल्या. परंतु आता या अडचणी दूर झालेल्या आहेत. मागच्या रविवारी या नवीन मेट्रो बघण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. ५५ हजार प्रवाशांनी मागच्या रविवारी यातून प्रवास केला परंतु सोमवारी कामकाजाच्या दिवसापासून पाहिजे, तसा प्रतिसाद प्रवाशांकडून भेटला नाही. या स्टेशन दरम्यान असलेल्या नावांमध्ये सुद्धा थोडासा गोंधळ आहे. बोरिवली पश्चिम असे स्थानकाचे नाव असले तरी पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानक गाठण्यासाठी दिड किलोमीटर अंतर प्रवाशांना कापावे लागत आहे. त्याचबरोबर मेट्रोची ही स्थानके हायवेलगत असल्याकारणाने एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाताना रस्ता ओलांडतांना सुद्धा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. जर ही स्थानक मेट्रो स्थानक आणि पश्चिम रेल्वे स्थानकमधील कनेक्टिविटी वाढवण्यात जर यांना यश आले, तर मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकेल.
रविवारचा आनंद लुटण्यासाठी मेट्रोत प्रवाशांची गर्दी :रविवार (आज) असल्याने आजच्या दिवशी सुद्धा यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हे परिवाराची संख्या होती. बरेच प्रवासी आपल्या परिवारासह किंवा मित्र-मैत्रीणी सह या मेट्रोचा आनंद घेण्यासाठी दिसून आली. त्याचप्रमाणे मेट्रोमध्ये प्रवास करताना सुद्धा अनेक प्रवाशांनी फोटोसेशन केले. यामध्ये विनातिकीट प्रवास करणे संभव नाही. परंतु प्रवास करताना तुमच्याकडून तिकीट हरवले किंवा तुम्ही चुकून एखाद स्टेशन पुढे उतरलात तर तुम्हाला ५० रुपये दंड आणि तिकिटांची किंमत द्यावी लागणार. तब्बल ७ वर्षांनंतर मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ हा २२.४० किलोमीटर रस्ता प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. २०१६ मध्ये या कॉरिडॉरच काम सुरू झाले. २०२० मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होणार होता. परंतु २ वर्षाच्या अंतरानंतर ३४ किलोमीटर पैकी २०.४० किलोमीटर अंतरासाठी सुरू झाला आहे. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ही मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.
२०३१ पर्यंत पूर्णत्वास येणार मेट्रो : वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी एमएमआरडीएकडून २००८ ते २०१९ दरम्यानच्या वाहतूक सर्वकष अभ्यास अहवाल तयार करण्यात आला होता. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो मार्गाची शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार ३३७ किलोमीटरचे मेट्रो मार्गाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेत १४ मार्गिका चे काम हाती घेतले आहे. त्यातील ११.४० किमीचा मेट्रो १ (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) जून २०१४ ला सेवेत दाखल झाला. मागच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील एकत्रित २०.७३ किमीचा दहिसर ते आरे टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या मार्गातील दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी २ ब, ३,४,५,६,९ मार्गिकांची कामे सुरू असून १०, ११,१२ या मार्गिकांची कामे लवकर सुरू होणार आहेत. उर्वरित मार्गिका येत्या काळात मार्गी लागणार असून, सध्या काम सुरू असलेल्या मार्गिका २०२६ पर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. उर्वरित मार्गिका २०३१ पर्यंत पूर्ण जारण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
हेही वाचा -MNS Loudspeaker : शिवसेना भवनासमोर भोंगा लावणारा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात