मुंबई -'कंगणा टीम' म्हणजेच कंगणा रणौत आणि भाजप आयटी सेल असे समीकरण आहे. तिच्या ट्विट्स आणि वक्तव्यांचा खरा सूत्रधार भाजप आहे. या कृतघ्न महिलेसोबत मिळून राम कदमांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा अपमान केला आहे; अशी बोचरी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत यांनी ट्विटरचा आधार घेत कंगणा आणि भाजपवर निशाणा साधला. "महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगणाचा निषेध केला नाही. कंगना आणि राम कदमांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे." असे ट्विट त्यांनी केले.