महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Teachers Welcomes Students : विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी आयडियाची कल्पना - teacher welcomes student

मुंबईतील बीडीडी चाळ क्रमांक 108 च्या समोर असलेल्या मराठा हायस्कूलने छान उपाय ( Teachers Welcomes Students ) शोधून काढला आहे.या शाळेत मुलांच्या स्वागताला मिकी माऊस, छोटा भीम आणि इतर कार्टून अवतरले आहेत.

school
school

By

Published : Feb 10, 2022, 6:20 PM IST

Updated : Feb 10, 2022, 8:08 PM IST

मुंबई -कोरोनामुळे दोन वर्ष बंद असलेल्या शाळा आता पुन्हा उघडल्या असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. अजूनही काही विद्यार्थी शाळेत जाण्यास कचरत आहेत. यावर मुंबईतील बीडीडी चाळ क्रमांक 108 च्या समोर असलेल्या मराठा हायस्कूलने छान उपाय ( Teachers Welcomes Students ) शोधून काढला आहे. शिक्षकांनी व व्यवस्थापकांनी नामी शक्कल लढवत मुलांच्या स्वागताला मिकी माऊस, छोटा भीम आणि इतर कार्टून आणले आहेत. या कार्टूनला पाहण्यासाठी लहान मुलं शाळेकडे आकर्षित होत आहेत.

मराठा हायस्कूल


'आयडियाची कल्पना'
या संदर्भात बोलताना शाळेच्या शिक्षिका वळींजकर मॅडम म्हणाल्या की, "आज जवळपास दोन वर्षांनी ही छोटी छोटी पावलं म्हणजेच तीन ते चार वर्षाची मुलं पहिल्यांदाच शाळेत येत आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी या मुलांना शाळेत येऊन आनंद वाटावा म्हणून आम्ही मिकी माऊस छोटा भीम सारखे कॅरेक्टर उभे केले होते. या मुलांचं मिकी माउस ने चॉकलेट देऊन स्वागत केलं. सोबतच त्यांच्या वर्गशिक्षकांनी मुलांचं औक्षण केलं."

स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र वाचनालय
"मुलांचं अभ्यासात मन लागावं त्यांना लगेच पालकांची आठवण येऊ नये म्हणून मुलांच्या वयोमानानुसार आम्ही शाळेच्या भिंती रंगवल्या आहेत. एकाच छताखाली मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आम्ही हे नियोजन केलं आहे. सोबतच या लहान मुलांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा व स्वतंत्र वाचनालय उभारण्यात आलं आहे. या वाचनालयातील पुस्तकं देखील या मुलांच्या वयाचा विचार करूनच ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा -Nawab Malik on Minority Communities : 'अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसासाठी अनुदान'

Last Updated : Feb 10, 2022, 8:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details