मुंबई - राज्यातील विना अनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांना शासनाने घोषित केलेल्या 20 टक्के आणि 40 टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणीच्या मागणीवरून गेल्या 21 दिवसांच्या मागणीवरून आझाद मैदानांवर आंदोलन सुरू आहे. आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विना अनुदानित आणि अंशता अनुदानित शाळांवर कोणताही निर्णय न झाल्यामुळे आक्रमक झालेल्या शिक्षकांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा बंगलावर आपला मोर्चा वळवला होता. मात्र, पोलिसांनी शिक्षकांना भर रस्त्यावर अडवून, त्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या शिक्षकांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात घेऊन आले.
शिक्षक आक्रमक; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर शिक्षकांनी काढला मोर्चा
राज्यातील विना अनुदानित आणि अंशता अनुदानित शाळांना शासनाने घोषित केलेले 20 टक्के आणि 40 टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी 21 दिवस शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत कोणताही निर्मय न झाल्यामुळे शिक्षकांनी शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला.
शिक्षक आक्रमक; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर शिक्षकांनी काढला मोर्चा
काय आहे प्रकरण -
प्रचलित नियमानुसार मिळणारे अनुदान शासनाने शिक्षकांच्या खात्यात जमा करावे, या मागणीसाठी महिनाभरापासून आझाद मैदानात शिक्षकांनी ठिय्या मांडला आहे. मात्र, आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान जाहीर केले आहे. परंतु, वित्त विभागाकडून अनुदान वितरण होत नसल्याने शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे