महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 27, 2021, 10:29 PM IST

ETV Bharat / city

लोकल ट्रेनच्या प्रवासावरून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवले ५१ प्रश्नांचे पत्र

इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या वार्षिक निकालाच्या कामासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत बोलवण्यात आले आहे. तसेच, आदेशसुद्धा शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. मात्र, रेल्वे प्रवासाची अनुमती अद्याप न मिळाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संतापले आहेत. आपला हा संताप व्यक्त करण्यासाठी शिक्षकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ५१ प्रश्नांचे पत्रच पाठवले आहे.

Local Railway
लोकल रेल्वे

मुंबई -इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या वार्षिक निकालाच्या कामासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत बोलवण्यात आले आहे. तसेच, आदेशसुद्धा शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. मात्र, रेल्वे प्रवासाची अनुमती अद्याप न मिळाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संतापले आहेत. आपला हा संताप व्यक्त करण्यासाठी शिक्षकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ५१ प्रश्नांचे पत्रच पाठवले आहे.

हेही वाचा -खुशखबर; उद्यापासून अंधेरी ते विरार दरम्यान धावणार पंधरा डब्यांची लोकल

रेल्वे प्रवासाची परवानगी न मिळाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खासगी वाहनातून प्रवास करत आहेत. अनेकदा लोकल प्रवासासाठी सतत पत्रव्यवहार व आंदोलन करण्यात आले. मात्र, शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

५१ प्रश्नांच्या भडिमार -

केंद्र सरकारचे उपनगरीय गाड्यांमधून प्रवास करणारे सर्व कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात का? जर नसतील तर त्या सर्वांना परवानगी कशी देण्यात आली? राज्य सरकारी लाखो कर्मचारी अत्यावश्यक सेवेत आहेत का? त्या सर्वांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची परवानगी कशी? मुंबई व परिसरातील सर्व मनपा कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडतात का? त्या सर्वांना परवानगी कशी? शिक्षकांनाच उपनगरीय प्रवास परवानगी देताना समस्या निर्माण होते का? गर्दी वाढते हे खरे नाही. महिला कर्मचार्‍यांनी लांबचा प्रवास कसा करावा, सकाळी ७ वाजता बदलापूर, पालघरसारख्या परिसरातून अंधेरी किंवा दक्षिण मुंबई परिसरात येण्यासाठी घरातून किती वाजता निघायला हवे? रात्री? आम्ही बस ने येतो तरी एकाला कोरोनाची लागण झाली, आता तरी आम्हाला वर्क फ्रॉम होम द्या, हे सरकारच्या लक्षात आणून द्या, अशा अनेक प्रश्नांचा भडिमार मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात पाठविण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकाकडेसुद्धा विनंती -

राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले की, ६ जूनपासून शिक्षण विभागाकडून शिक्षकांना शाळेमध्ये येण्याबाबत बंधनकारक केले आहे. मात्र, रेल्वे प्रवासाची अनुमती नसल्याने त्यांना शाळेमध्ये येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकदा शिक्षक आपले कर्तव्य बजावण्यासाठी खासगी वाहनाने शाळेत जात आहे. मात्र, त्यामुळे त्याला आर्थिक फटका बसत आहे. रेल्वे तिकीट खिडकीवरही शिक्षकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून त्यांच्याकडे आपल्या वेदना मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काही शिक्षकांनी रेल्वे प्रवासासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिका संजीवनी रायकर यांनाच विनंती करण्याची मागणी केली आहे.

...अन्यथा वर्क फ्रॉम होम द्या

शिक्षक - शिक्षकेतर, मुख्याध्यापक सर्वांच्या प्रतिक्रिया, प्रश्न संतप्त आहे. सर्व व्यक्त करणे शक्य नाही. रेल्वे प्रवास करू न देण्याचा सरकारचा हट्ट असेल तर किमान 'वर्क फ्राॅम होम' चे परिपत्रक शिक्षण खात्याने काढावे. ज्यांना आवश्यक आहे त्यांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी व इतरांना वर्क फ्रॉम होम लागू करावेत, अशी मागणीसुद्धा शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच पास देणार असल्याची माहिती - बोरनारे

आपत्ती व्यवस्थापन आता लोकल प्रवासासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच पास देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागातील (मुंबई, ठाणे, पालघर व रायगड) जिल्ह्यातील शिक्षकांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश द्या, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.

हेही वाचा -‘इश्क पर जोर नहीं’ मधील अहान आणि इश्की चे अखेर होतेय लग्न!

ABOUT THE AUTHOR

...view details