मुंबई- गेल्या पंधरा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी विनानुदानित शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. शिक्षकांवर झालेल्या लाठीमारानंतर आंदोलन अधिकच आक्रमक झाले असून या आंदोलनातील एका शिक्षकाने झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून त्या शिक्षकाला वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
मुंबई: शिक्षकाचा झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी घेतले ताब्यात - non grant teachers strike
विनानुदानित शिक्षकांचे पंधरा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु असून पोलिसांकडून झालेल्या लाठीमारानंतर आक्रमक झालेल्या आंदोलनात एका शिक्षकाने झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून त्या शिक्षकाला वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
![मुंबई: शिक्षकाचा झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी घेतले ताब्यात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4260850-890-4260850-1566927618235.jpg)
विनाअनुदानित शाळांना विधानसभेच्या आचारसंहितेआधी १०० टक्के अनुदान द्यावे. तसेच विना अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायम करावे. या प्रमुख मागण्यांसाठी गेले पंधरा दिवस आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने आंदोलनकर्त्या शिक्षकांचा सोमवारी बांध फुटला. अनेक आंदोलकांनी मैदानातून मंत्रालयाच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्या शिक्षकांवर लाठीमार केला. या घटनेने आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत असून शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला. एका शिक्षकाने मैदानातील झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेतले. त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु आहे.
दरम्यान विनानुदानित शिक्षकांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी शिक्षक आमदारांनी विधानभवनातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.