महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिक्षकांचे आंदोलन पुन्हा सुरू, 'मातोश्री'सह 'वर्षा'चा वाढणार ताप

तुटपुंजा पगार मिळत असल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पालिका व राज्य सरकारने अनुदान द्यावे, या मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी शिक्षकांनी आझाद मैदानात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र आश्वासन देऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आजपासून पुन्हा आझाद मैदानात शिक्षकांकडून आंदोलन केले जात आहे.

माहिती देताना शिक्षक

By

Published : Jun 17, 2019, 11:10 AM IST

मुंबई- महापालिकेच्या शिक्षण विभागाने मान्यता दिलेल्या १०४ शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आंदोलन केले. त्यावेळी शिक्षण मंत्री आणि महापौरांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने शिक्षकांनी आजपासून पुन्हा आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या शिक्षकांनी मागील आंदोलनदरम्यान मातोश्री, वर्षावर धडक दिली होती. यावेळीही असेच आंदोलन होणार असल्याने ऐन अधिवेशनात मातोश्री आणि वर्षाचा ताप वाढणार आहे.

माहिती देताना शिक्षक


मुंबई महापालिकेने मान्यता दिलेल्या शाळांमधील शिक्षकांना तुटपुंजा पगार मिळत असल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पालिका व राज्य सरकारने अनुदान द्यावे, या मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी शिक्षकांनी आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान शिक्षकांनी पालिका मुख्यालय, शिवसेना पक्षप्रमुख राहत असलेल्या मातोश्री या निवासस्थानात घुसून आंदोलन केले. शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या सेना भवनातही आंदोलन करण्यात आले.
शिक्षकांच्या आंदोलनामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पालिका मुख्यालयात येऊन बैठक घ्यावी लागली. या बैठकीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांची उपस्थिती होती.

या बैठकीत अनुदान देण्यासाठी आधी रोस्टर तपासले जाईल, शिक्षणमंत्री, महापौर तसेच शिक्षण समिती अध्यक्ष यांची समिती बनवून बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आजपासून पुन्हा आझाद मैदानात शिक्षकांकडून आंदोलन केले जात आहे. मागील आंदोलनापेक्षा हे आंदोलन उग्र असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षाचा ताप मात्र वाढणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details