मुंबई - अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकाने शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. गजानन खैरे असे या शिक्षकाचे नाव असून, तो आमदार निवासच्या चौथ्या मजल्यावर चढला आहे. त्याला खाली उतरवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे आमदार निवास येथे पोहचले आहेत. पोलीस अधिकारीही येथे दाखल झाले आहेत.
VIDEO : अनुदानाच्या मागणीसाठी आमदार निवास येथे शिक्षकाचे शोले स्टाईल आंदोलन
अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक गजानन खैरे यांनी मुंबईतील आमदार निवासच्या चौथ्या मजल्यावर शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
आमदार निवास येथे शिक्षकाचा शोले स्टाईल ड्रामा
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार श्रीकांत देशपांडे आणि आमदार दत्तात्रय सावंत हे त्या शिक्षकाला समजवण्यासाठी आमदार निवासच्या चौथ्या मजल्यावर दाखल झाले आहेत. जालना येथील विनाअनुदानित शाळेतील हा शिक्षक आहे.
Last Updated : Sep 16, 2020, 8:06 PM IST