महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

TC handed over missing children to their parents टीसीने घडवली माय लेकरांची घडवली भेट, समोपदेशन करून बालकांना केले पालकांच्या हवाली - missing

मुंबईतील मध्य रेल्वे वरील रेल्वे स्थानकात गणवेशात असलेल्या टीसीने हरवलेल्या व पळून आणलेल्या मुलाला धीर देत त्याच्या कुटुंबियांसोबत भेट TC Handed Over Missing Children To Their Parents घडवली. TC Handed Over Missing Children To Their Parents

TC handed over missing children to their parents
टीसीने बेपत्ता मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले

By

Published : Aug 27, 2022, 5:57 PM IST

मुंबईतिकीट तपासणीस कर्मचारी हा भारतीय रेल्वेच्या Indian Railway फ्रंटलाइन स्टाफपैकी एक आहे, जो प्रवाशांच्या थेट संपर्कात असतो. प्रवाशांनी योग्य तिकिटे प्रवासी प्राधिकरणासह प्रवास केला आहे. याची खात्री करण्याची जबाबदारी त्यांना प्रामुख्याने सोपवण्यात आली आहे. मात्र ही जबाबदारी करत असताना मुंबईतील मध्य रेल्वे वरील रेल्वे स्थानकात गणवेशात असलेल्या टीसीने हरवलेल्या व पळून आणलेल्या मुलाला धीर देत त्याच्या कुटुंबियांसोबत भेट TC Handed Over Missing Children To Their Parents घडवली.



मुंबई विभागातील तिकीट तपासणीचे काम हे अधिक आव्हानात्मक आहे. उपनगरीय गाड्या आणि स्थानकांवर गर्दीच्या वेळेत तपासणीची प्रक्रिया करावी लागते, तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना कर्तव्यावर असताना शिस्तबद्ध आणि कठोर असणे आवश्यक असते. अशा आव्हानात्मक प्रक्रियेमध्ये तिकीट तपासणी यांनी हरवलेल्या मुलांना शोधले आणि कुटुंबीयांसोबत भेट घडवली आणि पालकांचा जीवात जीव आला.



श्री. सुनील कुमार यादव, वरीष्ठ तिकीट परीक्षक यांना कल्याण स्टेशनवर दोन मुले सापडली, जी घरातून पळालेली होती.
जितेंद्र मीणा, मुख्य तिकीट परीक्षक यांना घाटकोपर येथे एक हरवलेला लहान मूलगा सापडला. तर डी. पी. लाड आणि श्रीमती दीपा पाटील, तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी दादर स्टेशनवर 12810 हावडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेलमध्ये दोन अल्पवयीन मुली शोधून काढल्या, ज्या घरातून पळून आल्या होत्या. त्यांचे समुपदेशन करून त्यांना बाल संगोपन केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले. ऑगस्ट 2022 मध्ये हरवलेल्या, पळून गेलेल्या मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले. अशा एकूण ८ प्रकरणांची नोंद झाली. एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत एकूण १६ प्रकरणे नोंदवण्यात आली.



आपल्या कुटुंबियांना काहीही न सांगता काही भांडणामुळे कौटुंबिक समस्यांमुळे ही मुलं पळून गेली होती. त्यांना आरपीएफच्या मदतीने बाल संगोपन केंद्राकडे सुपूर्द केले जाते. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली. TC Handed Over Missing Children To Their Parents

हेही वाचा Mumbai Andheri Railway Station अंधेरी रेल्वे स्थानकाच्या लिफ्टमध्ये अचानक बिघाड, सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढले

ABOUT THE AUTHOR

...view details