मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. पावसामुळे घाटकोपर येथील पंतनगर परिसरातील आर. एन. नारकर मार्गावर महाकाय वृक्ष उन्मळून पडले आहेत. तसेच घाटकोपर बस डेपो जवळील लक्ष्मीबाग नाला तुडुंब भरून वाहत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दोन्ही ठिकाणी भेट देऊन, नागरिकांशी संवाद साधला. यावेळी चक्रीवादळामुळे कोसळलेले वृक्ष तातडीने हलवण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. यावेळी महापौरांसोबत राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांची देखील उपस्थिती होती.
चक्रीवादळाचा वाहतुकीवर परिणाम