मुंबई -राज्यातकोरोनाची रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे सरकारने मूल्यमापन व परीक्षेचे स्वरूप शिथिल करून विद्यार्थ्यांच्या मानसिकेतेचा विचार करावा. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षा मुक्त वातावरणात घेण्यात याव्यात किंवा त्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती मराठी शाळा संस्थाचालक संघातर्फे करण्यात आली आहे.
हेही वाचा -'लसीचा केवळ दीड दिवस पुरेल एवढाच साठा, ५-६ दिवसांत ऑक्सिजनची कमतरता भासेल'
मुक्त वातावरणात परीक्षा घ्या-
मराठी शाळा संस्थाचालक संघाच्या ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या बैठकीत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भातील पत्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र सध्या राज्यामध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी-शिक्षकांचा विचार करता परीक्षेबाबत शेवटच्या टप्यात निर्णय न घेता शक्य तेवढ्या लवकर निर्णय घेऊन या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. मूल्यमापन व परीक्षेचे स्वरूप शिथिल करून मुक्त वातावरणात या परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाने परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करायला हवा, असे मत संस्थेच्या बैठकीत मांडण्यात आले.
शिक्षण मंत्र्याना पत्र-
मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी सांगितले की,परीक्षेच्या कार्याचे विकेंद्रीकरण स्थानिक पातळीवर विभागवार किंवा जिल्हावार करून जिथे परीक्षा घेण्यायोग्य परिस्थिती आहे अशा ठिकाणी परीक्षा घेण्यासोबत पेपर तसापणी सुद्धा स्थानिक पातळीवर करता येईल का याचा विचार व्हायला हवा. परीक्षेचे नियोजन करण्याआधी कोणत्याही वयोगटाचा विचार न करता सर्व शालेय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना सरसकटपणे लसीकरण करून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत योग्यवेळी निर्णय घ्यायला हवा. अशा प्रकारची भूमिका मराठी शाळा संस्थाचालक संघाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून आम्ही मांडली आहे.
हेही वाचा -'रेमडेसिवीर' तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक