महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 22, 2022, 3:31 PM IST

ETV Bharat / city

Kamala Building Fire : जखमींना दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा - गिरीश महाजन

ताडदेव परिसरातील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आज आग लागली (Kamala Building Fire). या आगीत आतापर्यंत 6 जणांचा (Six Deaths) मृत्यू झाला आहे. यावेळी जखमींना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे.

girish mahajan
कमला इमारत आग- गिरीश महाजन

मुंबई - ताडदेव परिसरातील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आज आग लागली (Kamala Building Fire). इमारत 20 मजली असून याच्या 18 व्या मजल्यावर ही आग (Mumbai Fire) लागली होती. या आगीत आतापर्यंत 6 जणांचा (Six Deaths) मृत्यू तर 18 जण जखमी झाले आहेत. आग लागल्याचे समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान (Mumbai Fire Brigade) पोहचले व त्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी किंवा स्थानिकांनी जखमींना बाहेर काढलं त्या जखमींना तिकडच्या खासगी रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्याने यामध्ये मृत्यूचा आकडा वाढला असं सांगण्यात येत आहे. या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे.

  • जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई करणार-

आज सकाळी पावणे आठच्या सुमारास ताडदेव येथील कमला इमारतीला आग लागली. ही आग लेव्हल 3 ची होती. या आगीत 18 जण जखमी झाले असून त्यांना भाटिया व इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. कमला इमारतीच्‍या शेजारीच भाटिया हॉस्पिटल असल्याकारणाने प्रथम बहुतेक जखमींना भाटिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. परंतु काहींची प्रकृती गंभीर असल्याकारणाने त्यांना वोकहार्ड व रिलायन्स या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. परंतु तेथे त्यांना दाखल करून घेण्यास तेथील प्रशासनाने नकार दिल्याने पुन्हा त्या जखमींना इतरत्र हलवण्यात आलं. यामध्ये त्यांचा जीव गेल्याचेही सांगितले जात आहे. २ रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नकार देणाऱ्या या दोन्ही रुग्णालयावर कारवाही करण्यास आयुक्तांना आपण सांगणार असल्याचं, किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

  • महापालिकेचासुद्धा हलगर्जीपणा -

मुंबईमध्ये अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडून येतात व जखमींवर तत्काळ उपचार करण्यास खासगी रुग्णालय नकार देतात. याचे कारण त्यांना भीती असते की या जखमींच्या उपचाराचा खर्च कोण देईल? त्यांचे पैसे त्यांना भेटतील की नाही? म्हणूनच अशा प्रकारची अवस्था होते. नागरिकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. त्याचबरोबर अशा घटना घडल्यावर महापालिकेचे अधिकारी, महापौर फक्त दोन दिवस त्याचा बाऊ करतात नंतर शांत होतात, असे सांगत यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही महाजन यांनी केली आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचा सुद्धा अक्षम्य हलगर्जीपणा यामध्ये दिसून येतो, असा आरोपही भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details