मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव असताना राज्यातल्या अनेक महापालिका, नगर पालिका आणि ग्राम पंचायती सफाई कामगारांना आवश्यक ते संरक्षक साहित्य पुरवत नाहीत. या काळात मास्क आणि सॅनिटायझर मिळाल्याशिवाय सफाई कामगारांनी कामच करू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
मास्क आणि सॅनिटायझर मिळाल्याशिवाय सफाई कामगारांनी काम करू नये, केंद्रीय मंत्री आठवले यांचे आवाहन - masks and sanitizers,
मास्क आणि सॅनिटायझर मिळाल्याशिवाय सफाई कामगारांनी काम करू नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री आठवले यांनी केले आहे. तसेच थकीत वेतनही देण्यासाठी शासनाने कंत्राटदारांना सूचित करावे असेही आठवले यांनी सांगितले.
राज्यातल्या अनेक भागातून सफाई कामगारांच्या तक्रारी येत आहेत. आपला जीव धोक्यात घालून सफाई कामगार जनतेसाठी अत्यावश्यक सेवा देत आहे. त्या घटकाला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानादेखील दुर्लक्षित केले जात आहे. त्यामुळे राज्यातल्या पालिकांनी याची गंभीर दखल घेऊन सफाई कामगारांना आवश्यक ते साहित्य पुरवावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी केंद्राने संबंधित प्रशासनाला 50 लाखांचा विमा देण्याची सूचना केली केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कामगारांचाही समावेश करावा, अशीही मागणी आठवले यांनी केली आहे. तसेच राज्यातल्या अनेक पालिकांमध्ये कंत्राटी आणि अस्थायी सफाई कामगार आहेत. त्या कामगारांना अद्याप गेल्या महिन्यांचे वेतनही मिळाले नाही. संबंधित कंत्राटदाराने या कामगारांना त्वरित वेतन द्यावे, यासाठी शासनाने कंत्राटदारांना सूचित करावे, असेही आठवले यांनी सांगितले.