महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Swapna Patkar threat case: स्वप्ना पाटकर धमकी प्रकरण; वाकोली पोलिसांची तपासाच्या परवानगीकरिता बांद्रा कोर्टात धाव - संजय राऊतांची स्वप्ना भास्करांना धमकी

स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात दिलेला जबाब ( Swapna Patkars statement against Sanjay Raut ) माघारी घेण्यासंदर्भात पत्रामध्ये धमकी आली होती. पोलिसांनी प्रकरणाचा तपासाकरिता बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर अर्ज दाखल ( Vakodi Police rushed in Bandra Court ) केला आहे.

Swapna Patkar Vs Sanjay  Raut
स्वप्ना पाटकर विरुद्ध खा. संजय राऊत

By

Published : Jul 31, 2022, 4:47 PM IST

मुंबई- शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut threat Swara Patkar ) यांच्या अडचणी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणात ( Swapna Patkar Threat Case ) वाकोली पोलिसांकडून NC दाखल ( NC Against Sanjay Raut ) करण्यात आली होती. पोलिसांनी प्रकरणाचा तपासाकरिता बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर अर्ज दाखल ( Vakodi Police rushed in Bandra Court ) केला आहे. त्यामुळे राऊत ( Sanjay Raut threat Swara Bhaskar ) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


पत्राचाळ गृहनिर्मााण घोटाळा प्रकरणाची चौकशी -पत्राचाळ गृहनिर्मााण घोटाळा प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात स्वप्ना पाटकर यांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात दिलेल्या जबाब माघारी घेण्यासंदर्भात पत्रामध्ये धमकी आली होती. त्यानंतर या सर्व प्रकाराची माहिती मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात संजय राऊत हे मास्टरमाइंड असल्याचे देखील स्वप्ना पाटकर यांनी म्हटले होते.

बांद्रा कोर्टात अर्ज सादर -मुंबई पोलीस आयुक्त यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात तपास करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता या प्रकरणात सखोल चौकशी करण्याकरिता बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर अर्ज करण्यात आला आहे. चौकशी करण्याची परवानगी पोलिसांकडून मागितली आहे.


पाटकर आणि राऊत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल - स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्यातील संभाषणाची कथेत ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या क्लिपमध्ये संजय राऊत यांच्याकडून स्वप्ना पाटकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाचीही ऑडिओ क्लिप आहे. मात्र या संदर्भातील ही क्लिप खरी आहे की नाही, या संदर्भात ईटीव्ही भारत कुठलीही पुष्टी करत नाही आहे.


हेही वाचा-Why ED taking Action Against Sanjay Raut : संजय राऊतांवर ईडीची कारवाई सुरू, जाणून घ्या, आरोप आणि कारणे

ABOUT THE AUTHOR

...view details