मुंबईगणपती उत्सव दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारीनंतर पुन्हा बहरतोय. जनतेने अत्यंत उत्साहाने आनंदाने गणपतीच्या उत्सवासाठी तयारी केली. विविध ठिकाणी गणपतीची मोठी मूर्ती आकर्षक मूर्ती आपल्याला जागोजागी Ganesha Made From Banana Poles दिसते. मात्र, मुंबईतील बालगोपाळ मित्रमंडळ या गणेश मंडळाने Balgopal Mitramandal Ganesh Mandal in Mumbai आगळीवेगळी मूर्ती साकारली Balgopal Mandal Created Different Idol आहे. जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत.
श्रीगणेशाचे आगमन म्हणजे चैतन्याची सुरुवात गणपती उत्सव आला की, उत्सवासाठी दोन महिने, तीन महिने आधी मंडळाचे कार्यकर्ते विविध तयारीला लागतात. वर्गणी, मंडप मूर्ती त्या अनुषंगाने संपूर्ण दहा दिवस आणि त्याची तयारी अत्यंत चैतन्यमय असते. बाजारामध्ये गणपतीच्या अनेक प्रकारच्या मूर्त्या तसेच सजावटीसाठी प्लास्टिकच्या, पुठ्ठ्याच्या, थर्माकोलच्या वस्तूदेखील दिसतात. विद्युत रोषणाईसाठी इलेक्ट्रिकच्या माळा अशा इत्यादी अनेक वस्तूंची रेलचेल असते. मात्र, विलेपार्ले येथील बाल गणेश मित्रमंडळ यांनी Bal Ganesha Mitramandal in Vileparle चक्क केळीच्या खांबापासून गणपती बनवलेला आहे. कशा रीतीने केळीच्या खांबापासून गणपतीची मूर्ती Bal Ganesha Mandal Made Ganesha From Banana Pole साकारली जाणून घेऊया यावरील खास रिपोर्ट
टाकाऊतून टिकाऊ, गणपती केळीच्या खांबापासून बनवला गणपतीआपल्याकडे लग्नाच्या वेळी किंवा अनेक जण धार्मिक किंवा आपापल्या जातीचे सण, आरत्या पूजा करीत असतात. त्यावेळी केळीचे खांब प्रवेशद्वारावर लावण्याची परंपरा आहे. लग्न सोहळा किवा कार्यक्रम उरकला की केळीचे खांब कचराकुंडीत फेकले जातात. मात्र, या बाल गणेश मित्रमंडळाने याचा अनोखा वापर केला आहे. मूर्तिकार राजेश दिगंबर मयेकर यांनी पर्यावरणपूरक आणि अत्यंत नावीन्यपूर्ण अशा केळीच्या खांबापासून मूर्ती बनवलेली आहे. यासाठी आठ ते नऊ महिने कालावधी लागतो, असे मूर्तिकार राजेश दिगंबर मयेकर यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.