महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

DCP Saurabh Tripathi : दरोड्याचा गुन्हा अवैध; निलंबित डीसीपी त्रिपाठींच्या वकिलाचा न्यायालयात युक्तीवाद - अंगडिया खंडणी वसुली

काळबादेवी येथील अंगडिया व्यवसायिकांना प्राप्तिकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी ( Angadiya traders in Kalbadev ) मुंबई पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या दरोड्याचा गुन्हा अवैधरित्या दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद सौरभ त्रिपाठी यांच्यावतीने वकील अनिकेत निकम ( Aniket Nikam counsel for Saurabh Tripathi ) यांनी न्यायालयात केला.

सौरभ त्रिपाठी
सौरभ त्रिपाठी

By

Published : Mar 28, 2022, 7:31 PM IST

मुंबई- प्राप्तिकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी निलंबित झालेले डीसीपी सौरभ त्रिपाठी अद्याप फरार आहेत. त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सर्व त्रिपाठी यांच्याकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे.

काळबादेवी येथील अंगडिया व्यवसायिकांना ( Angadiya traders in Kalbadev ) प्राप्तिकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा ( Extortion case against Mumbai Police ) दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या दरोड्याचा गुन्हा अवैधरित्या दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद सौरभ त्रिपाठी यांच्यावतीने वकील अनिकेत निकम ( Aniket Nikam counsel for Saurabh Tripathi ) यांनी न्यायालयात केला. यावेळी त्यांनी यापूर्वीचे निकाल न्यायालयासमोर सादर केले.

हेही वाचा-Elite Status for Marathi : केंद्र सरकारचा इव्हेंटजीवी कारभार, सुभाष देसाईंचा अभिजात भाषेच्या दर्जावरून टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्यानंतर सौरभ त्रिपाठी निलंबित

सौरभ त्रिपाठी यांच्याकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. उद्या सरकार वकील युक्तिवाद करणार आहे. निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना विभागाकडून निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा-Minister Aditya Thackeray Nanar Project : 'नानार प्रकल्प विरोध नसलेल्या जागेत उभारणार


कोण आहेत सौरभ त्रिपाठी?
डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्रिपाठी यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. तिथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगले काम केलेले होते. त्यानंतर मुंबईत परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिले आहे. त्यांची नियुक्ती परिमंडळ 2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. जिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली. पण त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही. दरम्यान त्रिपाठी यांना पहिले आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. गृहविभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा-विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय


सौरभ त्रिपाठी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव
खंडणी प्रकरणात अटकेच्या भीतीने सौरभ त्रिपाठी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. बुधवारी (23 मार्च) या अर्जावर सुनावणी होणार आहे. याशिवाय त्रिपाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठीचा अहवाल मुंबई पोलिस आयुक्तालयातून गृहविभागात पाठवण्यात आला आहे.

चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल
अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी वसूल प्रकरणात चार दिवसांपूर्वी त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील ओम वंगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यावसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली हेाती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाठी हे सुटीवर गेले होते. आता पोलीस त्यांच्या शोधात आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.

काय आहेत आरोप?
गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी अंगडिया असोसिएशनने मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी अंगडियांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी दरमहा 10 लाख रुपयाची लाच देण्याची मागणी केली होती, असे आरोप करण्यात आले होते. वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणतात, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या चौकशीनंतर सौरभ त्रिपाठी चर्चेत आले. कोपर्डी प्रकरणाचा तपास करून त्यांनी आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details