महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुशांतसिंह प्रकरण: गोव्यातून गौरव आर्या त्याच्या मित्रासह बेपत्ता... - सुशांतसिंह प्रकरणातील संशयित

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू झाल्यानंतर अनेक प्रकरणे समोर येत आहेत. यातच रिया चक्रवर्ती आणि ड्रग्स डीलर गौरव आर्या यांच्या संबंधातले चॅट देखील समोर आले आहेत. प्रकरणी 'एनसीबी'चे पथक गोव्यात तपास करायला गेले असता गौरव बेपत्ता झाला आहे.

गौरव आर्या
गौरव आर्या

By

Published : Aug 27, 2020, 1:09 PM IST

Updated : Aug 27, 2020, 2:16 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी तपास केला जात असतानाच, रिया चक्रवर्ती आणि ड्रग्स डीलर गौरव आर्या यांच्या संबंधातले व्हाट्सअ‌ॅप चॅट समोर आले होते. यानंतर यासंदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात 'एनसीबी'चे पथक तपासासाठी गोव्यात दाखल झाले असून गोव्यातील ड्रग्स डीलर गौरव आर्या याचा शोध घेतला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौरव आर्या हा गोव्यातून बेपत्ता झाल्याचे समोर येते आहे. गौरव आर्या हा त्याचा मित्र अक्षित शेट्टी याच्यासोबत बेपत्ता असल्याचीही माहिती आहे.

16 ऑगस्टला गोव्यामध्ये एक रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. कारवाई दरम्यान या रेव्ह पार्टीत गौरव आर्या याने अंमली पदार्थांचा पुरवठा केल्याचे समोर आले होते. नार्कोटिकस कंट्रोल ब्युरोकडून 20 संशयित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. यामधील काही संशयित सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित असल्याचेही सूत्रांकडून समजते. यामध्ये गौरव आर्या, सुरेश लोहिया, क्वाण एंटरटेनमेंट कंपनीची भागीदार जया सहा यांचा समावेश आहे. 'बिग बॉस'मध्ये भाग घेतलेले कलाकार एजाज खान, फारुख बटाटा, बकुल चांदणी यांच्यासह इतर जणांची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

Last Updated : Aug 27, 2020, 2:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details