मुंबई - सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय तपास करत असताना या संदर्भात रिया चक्रवर्ती वर सुशांतसिंहच्या कुटुंबातील सदस्यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे खंडन ज्येष्ठ वकील अशोक सरोगी यांनी केले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात सुशांतसिंहची माझी मॅनेजर श्रुती मोदीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रुती मोदीचे वकीलपत्र सरोगी यांनी घेतले आहे. अशोक सरोगी यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे कागदोपत्री असे पुरावे आहेत जे सिद्ध करू शकतात ती सुशांतसिंह डिप्रेशनमध्ये असताना या संदर्भात सुशांतच्या कुटुंबाला माहिती होती.
सुशांतवर उपचार सुरू असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना माहीत होते - अॅड. अशोक सरोगी
सुशांतसिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. यातच सुशांतसिंह ड्रिप्रेशनमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची सुशांतच्या कुटुंबाला माहिती असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सुशांतसिंह